अभिनेत्री नेहा पेंडसे इतकीच सुंदर आहे तिची सख्खी बहीण, ती देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 03:09 PM2021-06-21T15:09:02+5:302021-06-21T15:09:34+5:30

फार कमी लोकांना माहित आहे की, नेहा पेंडसेला बहिण असून तीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तसेच ती नेहा इतकीच दिसायला सुंदर आहे.

Did you see actress Neha Pendse's sister? She is also an actress | अभिनेत्री नेहा पेंडसे इतकीच सुंदर आहे तिची सख्खी बहीण, ती देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

अभिनेत्री नेहा पेंडसे इतकीच सुंदर आहे तिची सख्खी बहीण, ती देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

googlenewsNext

अभिनेत्री नेहा पेंडसेने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. नेहा पेंडसे अभिनयासोबत ग्लॅमरस आणि बोल्ड अदांमुळे चर्चेत येत असते. फार कमी लोकांना माहित आहे की, नेहा पेंडसेला बहिण असून तीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचे नाव आहे मीनल पेंडसे. 

१९९९ साली रिलीज झालेला मराठी चित्रपट बिनधास्त आठवतो आहे ना..या चित्रपटात मीनल पेंडसेने काम केले होते. मयुरी आणि वैजयंती या दोघी मैत्रिणींना त्यांच्या कॉलेजची मैत्रीण शीला खुनाच्या आरोपात कसे फसवते हे दाखवले होते. याच शीलाची भूमिका अभिनेत्री मीनल पेंडसेने साकारली होती. या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.

या चित्रपटानंतर मीनल पेंडसे २००२ साली प्रदर्शित झालेल्या आधारस्तंभ चित्रपटात दिसली. मात्र ती मराठी चित्रपटसृष्टीत फारशी रमली नाही.

मस्ती चित्रपट आणि किस देश में है मेरा दिल, अमिता का अमित, मी आज्जी और साहेब या हिंदी मालिकेत मीनलने काम केले.

मराठी चित्रपटसृष्टीपेक्षा हिंदी मालिकांमधून जास्त वाव मिळाला. त्यामुळे ती हिंदी सिनेसृष्टीत काम करताना दिसते. 


मीनल पेंडसेच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे तर तिने नंदकिशोर कुमावत सोबत अरेंज्ड मॅरिज केले आहे. हे तिचे दुसरे लग्न आहे.  


मीनल आणि नेहा हिंदी मालिकेत चांगल्याच लोकप्रिय आहेत. मात्र त्या दोघी सख्ख्या बहिणी आहेत हे फार कमी लोकांना माहित आहे. त्या दोघी फारशा एकत्र पहायला मिळत नाहीत. 


नेहा पेंडसेचा लवकरच जून हा चित्रपट रिलीज होणार आहे. तसेच सध्या ती भाभीजी घर पर है या मालिकेत पहायला मिळते आहे.

Web Title: Did you see actress Neha Pendse's sister? She is also an actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.