अल्पावधीतच लाखो लोकांपर्यंत पोहोचणा-या सोशल नेटवर्किंग साइटवर एखादी नवीन गोष्ट आली,  की लागलीच त्याचा ट्रेंड बनतो. असाच एक ट्रेंड सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे. #10yearchallenge ने नेटक-यांना अक्षरशः खूळ लावले आहे, यात आपल्या दहा वर्षापूर्वीचे आणि सध्याचे फोटो एका फ्रेममध्ये लावले जातात. विशेष म्हणजे बाॅलीवूडनेही या नव्या हॅशटॅगचे स्वागत केले असून, मराठी कलाकारांनी देखील #10yearchallenge स्वीकारले आहे.ज्यात अमेय वाघ, सुयश टिळक यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांचा तर अभिनेत्री अमृता खानविलकर, इशा केेेेसकर, रूपाली भोसले यांसारख्या कैक मराठी तारकांचा समावेश आहे.

 

 

 

 


Web Title: Did you see the # 10yearchallenge by the Marathi Actors
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.