​सैराट फेम रिंकू राजगुरूच्या आगामी चित्रपटाचे नाव तुम्ही ऐकले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 06:13 AM2017-12-19T06:13:32+5:302017-12-19T11:43:32+5:30

सैराटमधून प्रत्येकाच्या मनात घर केलेली आर्ची अर्थात रिंकू राजगुरू राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मकरंद मानेच्या नव्या चित्रपटात चमकणार असल्याचे सर्वांना ...

Did you hear the name of the upcoming film of Sirat Fame Rinku Rajguru? | ​सैराट फेम रिंकू राजगुरूच्या आगामी चित्रपटाचे नाव तुम्ही ऐकले का?

​सैराट फेम रिंकू राजगुरूच्या आगामी चित्रपटाचे नाव तुम्ही ऐकले का?

googlenewsNext
राटमधून प्रत्येकाच्या मनात घर केलेली आर्ची अर्थात रिंकू राजगुरू राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मकरंद मानेच्या नव्या चित्रपटात चमकणार असल्याचे सर्वांना कळलेच आहे. पण या चित्रपटाचे नाव काय हे गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते. पण आता या चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे नाव कागर असणार आहे.
रिंकू आणि मकरंदच्या या नव्या चित्रपटाचे नाव आणि त्याचा फाँट नुकताच सोशल मीडियात लाँच करण्यात आला. या नावाच्या डिझाईनवरून या चित्रपटाविषयी काही अंदाज व्यक्त करता येतोय. 'कागर' ह्या नावाचा फाँट हा बघताक्षणी अॅग्रेसिव्ह वाटतो. तसेच या डिझाईनमध्ये उधळलेला गुलाल हा कुतूहलतेचा विषय ठरतोय. गुलाल कायम विजयाचा रंग आहे. हा विजय नक्की कोणावर आहे. यामध्ये केलेली मात ही असुरावर आहे की, स्वतःमध्ये अडकलेल्या आपल्यावर आहे याचा अंदाज आपण हे नाव बघून बांधू शकतो. 
'कागर' या नावावर असलेले पांढरे डाग कदाचित उपरेपणाचे जाण करून देतात. आपण ज्या ठिकाणी आहोत तिथे आपले अस्तित्व या डागांसारखे तुरळक आहे अशी जाणीव या पांढऱ्या डागांमुळे होत राहते. तसेच काही ठिकाणी रक्ताचा ओघळ दिसत आहे, जो एका फांदीतून बाहेर पडलेला दिसतोय. ज्यातून या चित्रपटात बरीच नाट्यमयता आहे, याची शक्यता नाकारता येणार नाही. या चित्रपटात रिंकूसह बाकी कलाकार कोण आहेत, याचा तपशील लवकरच जाहीर केला जाणार आहे. 'उदाहरणार्थ निर्मित'चे सुधीर कोलते आणि विकास हांडे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.  
चित्रपटाच्या नावाच्या डिझाईनविषयी दिग्दर्शक मकरंद माने सांगतात, 'जेव्हा चित्रपटाचे नाव आपण जाहीर करतो, तेव्हा बऱ्याच गोष्टीची काळजी घ्यावी लागते. चित्रपटातून आपण नेमकं काय मांडू पाहतोय याची ती पहिली झलक असते. 'कागर'चा फाँट डिझाईन करणारे चैतन्य संत यांना कथा ऐकवल्यानंतर त्यांनी गोष्टीच्या महत्त्वाच्या घटकांचा विचार करून खूप विचारपूर्वक आणि कथेचा सार याचे मिश्रण करून आकर्षण निर्माण करणारा 'कागर'चा फाँट तयार केला आहे. चैतन्य संत हे नेहमी कथेची मांडणी आणि त्यावरून दृश्य स्वरूपात नेमकं काय दिसेल याचा अंदाज घेऊन डिझाईन करतात. रिंगण चित्रपटाच्या वेळी वडील मुलगा नाते आणि त्यातून कथेची साधेपणाची मांडणी याचा विचार करून प्रतिकात्मक पोस्टर तयार करण्यात आले होते, ज्यात परिस्थितीने आपण रिंगणात अडकतो याचे मांडणी करण्यासाठी त्यांनी रिंगण या नावाला एका गोलाकार भागात अडकवले होते. तसेच 'कागर'ला गोष्टीनुसार आकार देण्याचा प्रयत्न या नावाच्या डिझाईनवर केला आहे. हे बघून प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाविषयी नक्कीच कुतूहल निर्माण होईल, याची मला खात्री आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना बरीच सरप्राईज मिळणार आहेत.'

Also Read : ​रिंकू राजगुरूनंतर तिचे आई-वडील झळकणार या चित्रपटात

Web Title: Did you hear the name of the upcoming film of Sirat Fame Rinku Rajguru?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.