​का दिला सुशांत शेलारने दीपा परबला जोरात धक्का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2017 10:31 AM2017-06-23T10:31:03+5:302017-06-23T16:03:01+5:30

कलाकार हा नेहमी त्याच्या अभिनयाने ओळखला जातो. आपल्या अभिनयात नैसर्गिकपणा आणण्याचा तो कसोशीने प्रयत्न करत असतो. या प्रयत्नात सहकालाकारांसोबत ...

Did Sushant Shelar give Deepa pushabara loud? | ​का दिला सुशांत शेलारने दीपा परबला जोरात धक्का?

​का दिला सुशांत शेलारने दीपा परबला जोरात धक्का?

googlenewsNext
ाकार हा नेहमी त्याच्या अभिनयाने ओळखला जातो. आपल्या अभिनयात नैसर्गिकपणा आणण्याचा तो कसोशीने प्रयत्न करत असतो. या प्रयत्नात सहकालाकारांसोबत काहीतरी अनैच्छिक घडण्याची शक्यतादेखील अधिक असते. असेच काहीसे घडले 'अंड्या चा फंडा' या आगामी सिनेमातील अभिनेत्री दीपा परब सोबत. चित्रपटाच्या एका महत्त्वाच्या वळणावर दीपा आणि सहकलाकार सुशांत शेलारवर आधारित एक सीन शूट करायचा होता. ज्यात सुशांतला दीपाला घराबाहेर ओढून घ्यायचे होते. ठरल्याप्रमाणे सर्व सेट झाले आणि दिग्दर्शकांनी अॅक्शन म्हटल्यावर दोघांनी अभिनयाला सुरुवात केली. हा सीन अगदी खरा वाटावा म्हणून सुशांतने अगदी ताकद लावून दीपाला आपल्याकडे ओढले. सुशांतचा हा धक्का इतका जबरदस्त होता की दीपाला स्वतःचा तोल आवरता आला नाही आणि ती जोरात आदळली. सिनेमातील पात्राच्या भूमिकेत पूर्णपणे उतरलेल्या सुशांतला आपल्याकडून अनावधाने घडलेल्या या कृत्त्याची जाणीव झाली खरी. पण आता दीपा कशी रिअॅक्ट होईल, याचीच भीती त्याला अधिक वाटली. सेटवर उपस्थित असलेल्या सर्व टीमलादेखील दीपाची काळजी वाटत होती. त्यामुळे लगेचच काही तास चित्रीकरण थांबवण्याचा निर्णयदेखील दिग्दर्शकांनी घेतला. मात्र दीपाने ही घटना अगदी स्पोर्टिंगली घेत चित्रीकरण पुन्हा सुरू करायला लावले. सुशांतने देखील दीपाची माफी मागत सीन ओके केला. 
अध्यास क्रिएशनचे विजय शेट्टी यांची निर्मिती तसेच प्रशांत पुजारी आणि इंदिरा विश्वनाथ शेट्टी यांची सहनिर्मिती असलेला हा सिनेमा एका गुढ रहस्याची उकल करणारा आहे. 'सी.आय.डी.' आणि 'आहट' यांसारख्या मालिकेचे कथालेखन करणारे संतोष शेट्टी यांच्या दिग्दर्शकीय नजरेतून साकारण्यात आलेल्या या सिनेमात अथर्व बेडेकर, शुभम परब आणि मृणाल जाधव या तीन बालकलाकारांची प्रमुख भूमिका आहे. तसेच कथा देखील संतोष शेट्टी यांचीच असून पटकथा आणि संवाद अंबर हडप, गणेश पंडित आणि श्रीपाद जोशी यांनी लिहिले असल्यामुळे हा सिनेमा दर्जेदार कथानकाने परिपूर्ण असेल यात शंका नाही. 'अंड्या' आणि 'फंडया' या दोन मित्रांच्या मैत्रीवर आधारित असलेला हा सिनेमा ३० जून रोजी सर्वत्र प्रदाशित होत आहे. 

Also Read : अंड्याचा फंडा या चित्रपटात मराठीतील छोटे 'जय - वीरू'

Web Title: Did Sushant Shelar give Deepa pushabara loud?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.