coronaVirus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिंकू राजगुरूने चाहत्यांना दिला हा कानमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 01:28 PM2020-04-07T13:28:40+5:302020-04-07T13:32:15+5:30

सैराट फेम आर्ची उर्फ रिंकूदेखील या परिस्थितीत आपल्या चाहत्यांना कानमंत्र दिला आहे. 

coronavirus: Rinku Rajguru appeal to her fans TJL | coronaVirus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिंकू राजगुरूने चाहत्यांना दिला हा कानमंत्र

coronaVirus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिंकू राजगुरूने चाहत्यांना दिला हा कानमंत्र

googlenewsNext

कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. सोमवारी राज्यात १२० नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ८६८ वर पोहचली आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यात आता सैराट फेम आर्ची उर्फ रिंकूदेखील या परिस्थितीत आपल्या चाहत्यांना कानमंत्र दिला आहे. 

रिंकूने एक बुमरँग इंस्टाग्रामवर शेअर करत म्हटलं की, आशेने पुढे पहा, खेदाने मागे नाही.

रिंकू राजगुरु सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते. तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो. 

सैराटच्या यशानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिले नाही. या चित्रपटात आर्ची साकारणारी रिंकू राजगुरू भलतीच भाव खाऊन गेली. तिचा प्रत्येक ठसकेबाज संवाद, तिचा बुलेट अंदाज, परशावरील प्रेम असा प्रत्येक अंदाज रसिकांना भावला.


त्यामुळेच सैराटमधील आर्ची अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनली. त्यानंतर ती कागर सिनेमात झळकली. त्यानंतर ती मेकअप या मराठी चित्रपटातही दिसली. यात तिच्यासोबत चिन्मय उद्गीरगकर दिसला होता.
या सिनेमासाठी रिंकूने घेतलेले मानधन हे सर्वाधिक होते अशी चर्चा ऐकाला मिळाली होती. सध्या रिंकू ही मराठी सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.

Web Title: coronavirus: Rinku Rajguru appeal to her fans TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.