Coronavirus : अभिनेता आनंद इंगळे सरसावला सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 06:23 PM2020-03-20T18:23:38+5:302020-03-20T18:24:17+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आनंद इंगळेदेखील सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे.

Coronavirus: Actor Anand Ingle moved to help ordinary citizens | Coronavirus : अभिनेता आनंद इंगळे सरसावला सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी

Coronavirus : अभिनेता आनंद इंगळे सरसावला सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी

googlenewsNext


भारतात या व्हायरसचे जवळपास 170 पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 4 लोकांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. या व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पंतप्रधान मोदी यांनी यासाठी 22 मार्चला जनाता कर्फ्यूची हाक दिली आहे. कोरोना विषाणूची लागण रोखण्यासाठी सर्वच स्थरांवरून विविध उपाययोजयना सुचवल्या जात आहेत. आतापर्यंत अनेक सेलिब्रेटी पुढे येत कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जनजगागृती करत आहेत. त्यात मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आनंद इंगळेदेखील सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे.

आनंद इंगळे याने सोशल मीडियाच्या पोस्टच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले आहे. त्याने म्हटलंय की, हा रविवार सोडून..... पुण्यामध्ये कुणी आजी आजोबा ,आजारी तरुण व्यक्ती एकटे असतील तर त्यांच्यासाठी... तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कुणा आज्जी आजोबाना, रुग्णांना, काही वस्तू / किराणामाल / औषधे/ अगदी घराचे जेवण.. इत्यादी लागल्यास मला फोन करा. मी पुर्ण काळजीपूर्वक मास्क आणि हॅण्ड ग्लोव्ज तसेच सॅनिटायझरचा वापर करून तुमच्या दरवाजापर्यंत त्या वस्तू पोहोच करेन . धन्यवाद. संकोच करू नका.  आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आपण सुखरूप या संकटातून बाहेर पडू.


आनंद इंगळेच्या या कृतीचं सगळीकडून खूप कौतूक होत आहे. त्याच्या या पोस्टवर खूप कमेंट्स येत आहेत.



महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत असून आतापर्यंत हा आकडा 52 वर पोहोचला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधला आहे. 'कोरोनाच्याविरोधात जागतिक युद्ध सुरू असून संपूर्ण जगाला घरात थांबण्याची वेळ आली आहे. पुढचे 15 दिवस काळजी घेण्याची गरज आहे' असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

Web Title: Coronavirus: Actor Anand Ingle moved to help ordinary citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.