'हा' सिनेमॅटोग्राफर दिसणार दिग्दर्शकाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 07:15 AM2019-09-06T07:15:00+5:302019-09-06T07:15:00+5:30

ज्याच्या नजरेतून आपण सिनेमा बघतो तो म्हणजे सिनेमाचा सिनेमॅटोग्राफर. सिनेनिर्मितीत सिनेमॅटोग्राफरचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

cinematographer sanjay memane become director | 'हा' सिनेमॅटोग्राफर दिसणार दिग्दर्शकाच्या भूमिकेत

'हा' सिनेमॅटोग्राफर दिसणार दिग्दर्शकाच्या भूमिकेत

googlenewsNext

ज्याच्या नजरेतून आपण सिनेमा बघतो तो म्हणजे सिनेमाचा सिनेमॅटोग्राफर. सिनेनिर्मितीत सिनेमॅटोग्राफरचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मराठी रुपेरी पडदा सजीव करणाऱ्या अनेक तंत्रकुशल आणि लोकप्रिय सिनेमॅटोग्राफर मधलं एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे संजय मेमाणे. मराठी, हिंदीतल्या छोटया आणि मोठया पडद्यावरच्या असंख्य कलाकृतींना त्यांचा परिसस्पर्श झालाय, ते  प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे आता दिग्दर्शकाच्या भूमिकेतून आपल्या भेटीला येणार आहे. ‘मन उधाण वारा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे.  

आपल्या या नव्या इनिंगबद्दल बोलताना संजयजी सांगतात की, प्रत्येक माध्यम वेगळं आहे. सिनेमॅटोग्राफी करताना  दिग्दर्शकाला जे सांगायचं ते व्हिज्युअली मांडणं गरजेच असतं. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना एखादी गोष्ट व्हिज्युअली मांडण्यासोबत ते खुलविण्याचं कामही करावं लागतं तरच चित्रपटाची बांधणी उत्तम होते. या चित्रपटाची संहिता मला विशेष भावली. आयुष्याकडे बघण्याची दृष्टी व त्याबद्दलची जाणीव या भोवती चित्रपटाची मध्यवर्ती कथा फिरते.

निर्माते निशांत कौशिक तसेच सतीश कौशिक सारख्या उत्तम अभिनेता, दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी मिळाली हे माझ्यासाठी नक्कीच आनंददायी असून या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय खुर्चीवर बसण्याचा अनुभव मला मिळाला. सतीशजी यांनी मला संपूर्ण मुभा दिली होती त्यामुळे हा सगळा प्रवास सुंदर आणि खूप काही शिकवणारा होता.

 ‘द सतीश कौशिक एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स’ आणि ‘लोका एंटरटेनमेंट’ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ‘पेन मुव्हीज्’चे जयंतीलाल गडा यांच्या प्रस्तुतीखाली ‘मन उधाण वारा’ हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निशांत कौशिक, अक्षय गडा, धवल गडा चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा प्रदीप कुरबा यांची असून पटकथा-संवाद सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी लिहिले आहेत. छायांकन मिलिंद जोग तर संकलन कृष्णत घार्गे यांचे आहे.

Web Title: cinematographer sanjay memane become director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.