माझे जुने व्हर्जन डिलीट करा, त्याची मुदत संपली...! तेजस्विनी पंडितने शेअर केले फोटो; चाहते म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 01:15 PM2020-12-14T13:15:59+5:302020-12-14T13:19:40+5:30

काही तासांत 60 हजारांवर लाईक्स...

Bold photo shared by Tejaswini Pandit saying Delete that old version of me It Expired | माझे जुने व्हर्जन डिलीट करा, त्याची मुदत संपली...! तेजस्विनी पंडितने शेअर केले फोटो; चाहते म्हणाले...

माझे जुने व्हर्जन डिलीट करा, त्याची मुदत संपली...! तेजस्विनी पंडितने शेअर केले फोटो; चाहते म्हणाले...

googlenewsNext
ठळक मुद्देआईच्या पावलावर पाऊल ठेवत तेजश्रीने काही वर्षांपूर्वी ‘अगं बाई अरेच्चा’ या केदार शिंदेच्या चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली होती.

माझे जुने व्हर्जन डोक्यातून काढा, ते कधीच कालबाह्य झाले आहे, असे कोण म्हणतेय तर अभिनेत्री तेजस्विनी पंडित. होय, आणि यासाठी कारणही तसेच आहे. तेजस्विनीने तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 
बेडरूममधील या फोटोला तेजस्विनीने दिलेल्या कॅप्शनची खास चर्चा आहे. माझे जुने व्हर्जन डोक्यातून काढा. कारण त्याची मुदत आता संपलीये, असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

या फोटोंमध्ये तेजस्विनी निळ्या रंगाच्या गाऊनमध्ये आहे. या फोटोंवर चाहत्यांनीही तितक्यात कडक प्रतिक्रिया दिल्या आहेत. केवळ चाहतेच नाही तर मराठी सेलिब्रिटींनीही यावर कमेंट केल्या आहेत. अमृता खानविलकरने यावर ‘सो हॉट’ अशी कमेंट केली आहे. तुझे हे नवे व्हर्जन खरोखर कडक आहे. आणखी फोटो शेअर कर, असे एका चाहत्याने यावर लिहिले आहे. अनेकांनी एकदम कडक, आग नुसती अशा कमेंट केल्या आहेत. आत्तापर्यंत 60 हजारांवर लोकांनी या फोटोंना लाईक केले आहे.

अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोशल मीडियावर सक्रिय असणा्या कलाकारांपैकी एक आहे. इन्स्टाग्रामवर तिचे फोटो, व्हिडीओ आणि आगामी प्रोजेक्टची माहिती ती चाहत्यांना देत असते.  

मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे असे सिनेमा, विविध नाटकं आणि १०० डेज सारख्या मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे रसिकांसह तेजस्विनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री बनली आहे. सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

 

 तेजस्विनीची आई ज्योती चांदेकर या मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. आईच्या पावलावर पाऊल ठेवत तेजश्रीने काही वर्षांपूर्वी ‘अगं बाई अरेच्चा’ या केदार शिंदेच्या चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली होती.

Web Title: Bold photo shared by Tejaswini Pandit saying Delete that old version of me It Expired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.