मराठी सिनेइंडस्ट्रीतील बोल्ड अभिनेत्री नेहा पेंडसेनं दिली प्रेमात असल्याची कबूली, जाणून घ्या तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 05:00 PM2019-08-15T17:00:00+5:302019-08-15T17:00:00+5:30

नेहा पेंडसेनं नुकतंच इन्स्टाग्राम अकाउंटवर बॉयफ्रेंडसोबतचा एक फोटो शेअर करत ती प्रेमात असल्याची कबूली दिली.

Bold actress Neha Pendse confesses to being in love with this person, know about him | मराठी सिनेइंडस्ट्रीतील बोल्ड अभिनेत्री नेहा पेंडसेनं दिली प्रेमात असल्याची कबूली, जाणून घ्या तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल

मराठी सिनेइंडस्ट्रीतील बोल्ड अभिनेत्री नेहा पेंडसेनं दिली प्रेमात असल्याची कबूली, जाणून घ्या तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल

googlenewsNext

अभिनेत्री नेहा पेंडसेच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तुम्ही नजर टाकली असता तुम्हाला तिचे वेगवेगळ्या अंदाजातील ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतील. मात्र नुकताच तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आणि तिची एगेंजमेंट झाल्याच्या चर्चांना उधाण आलं. खरंतर काही दिवसांपूर्वी अभिनेता अभिजीत खांडकेकरनं केलेल्या एका पोस्टमुळे नेहाच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र त्यावेळेस या वृत्तात तथ्य नसल्याचं सांगितलं होतं. 

नेहा पेंडसेनं त्यावेळी तिने तथ्य नसलं असल्याचं सांगितलं तरी आता तिच्या या फोटोमुळे लग्नाची बातमी कन्फर्म झाली असून नेहा लवकरच शार्दुल सिंग बयास या बिझनेसमनसोबत लग्नबेडीत अडकणार आहे.


नेहा व शार्दुल रिलेशनशीपमध्ये असून तिने इंस्टाग्रामवर इटलीमधील त्या दोघांचा रोमँटिक अंदाजातील फोटो शेअर करीत हार्टचं सिम्बॉल टाकलं आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शार्दुल सिंग बयास हा एक बिझनेसमन असून नेहा आणि शार्दुलनं मिलान इथे खासगी साखरपुडा केला आहे. लवकरच ते लग्न करणार असल्याचं बोललं जातं आहे.


नेहा व्यतिरिक्त शार्दुलनंही नेहा सोबतचे फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यात शार्दुल आणि त्याच्या फॅमिलीसोबत नेहा दिसत आहे.

नेहाने बालकलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती एका मध्यवर्गीय कुटुंबातील आहे, तिचे वडील हे बिझनेसमन असून आई ही गृहिणी आहे. तिने अभिनयक्षेत्रात करियर करण्यामागे तिच्या आईचा मोठा हात होता. 

नेहाने अनेक मराठी तसेच हिंदी मालिका, चित्रपट आणि रिअ‍ॅलिटी शोमधून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रात काम करण्याआधी तिने दक्षिण भारतीय चित्रपटांमधून देखील काम केलं होतं. 

झी मराठीवरील भाग्यलक्ष्मी या मालिकेत तिने सहनशील गृहिणीची भूमिका केली होती. तिची ही मालिका चांगलीच गाजली होती. 

Web Title: Bold actress Neha Pendse confesses to being in love with this person, know about him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.