विदर्भाच्या लेकीचा जगभर डंका वाजतोय. बिकीनी क्वीन म्हणून या मराठमोळ्या अभिनेत्रीने लोकप्रियता मिळवली आहे. या बिकीनी क्वीन अभिनेत्रीचे नाव निकीता गोखले असं आहे. 2015 साली प्रदर्शित झालेला 'कॉलेज' सिनेमातून तिने आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरूवात केली होती. तुर्तास निकीता आपले विविध अंदाजातील फोटोशूट करत रसिकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करते आहे.


नुकतेच  तिने अनेक मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे. परदेशातही या विदर्भ कन्येनं आपल्या हॉट अदांचा जलवा दाखवला आहे. सोशल मीडिया इन्स्टाग्राम अकाउंटवरील निकीताचे बिकीनी अवतारातील फोटोंवर कुणीही घायाळ होईल. तिच्या या अंदाजावर नेटकरी फिदा झालेत. 
या फोटोंवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू झाला आहे.

निकिताचा जन्म नागपूरजवळील तुमसर या गावी झाला असून वयाच्या १७ व्या वर्षी ती तुमसरहून नागपूरला आली होती. निकिताचं खरं नाव हे दुर्गा गोखले असं आहे. मात्र मॉडेलिंगच्या क्षेत्रात आल्यानंतर तिने आपलं नाव निकीता गोखले असं बदललं. 

मॉडेलिंगमध्ये येण्याआधी निकिता ही दिल्लीतील एका कंपनीमध्ये आर्थिक सल्लागार म्हणून काम करत होती. २०१५ साली निकिता मिस वर्ल्ड बिकिनी इंटरनॅशनल स्पर्धेत सहभागी झाली होती. शिवाय त्याच वर्षी ती मिस इंडिया बिकिनी स्पर्धेत विजयी ठरली होती. या स्पर्धेतील यशानंतर निकिताला बरीच प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली.

त्यानंतर तिने व्यावसायिक फोटोशूट सुरू केलं. २०१७ साली निकताने वर्ल्ड स्विमसूट मॉडेल स्पर्धेत देखील भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं. या स्पर्धेत ती अंतिम फेरीपर्यंत पोहचली होती.


Web Title: Bikini Girl Nikita Gokhale’s Sexy Look on social Media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.