'बिग बॉस'नंतर मीरा जगन्नाथचा आणखी एक दणका; झळकणार 'या' वेब सीरिजमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 07:33 PM2021-10-05T19:33:53+5:302021-10-05T19:41:50+5:30

Mira Jagannath: मीराच्या याच चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. मीराची मुख्य भूमिका असलेली एक वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

bigg boss marathi 3 fame mira Jagannath new web series tuzi mazi yaari coming soon | 'बिग बॉस'नंतर मीरा जगन्नाथचा आणखी एक दणका; झळकणार 'या' वेब सीरिजमध्ये

'बिग बॉस'नंतर मीरा जगन्नाथचा आणखी एक दणका; झळकणार 'या' वेब सीरिजमध्ये

googlenewsNext
ठळक मुद्देतुषार घाडीगावकर दिग्दर्शित 'तुझी माझी यारी' या नव्या कोऱ्या वेब सीरिजमध्ये मीरा जगन्नाथ झळकणार आहे.

पहिल्या दिवसापासून बिग बॉसचं घर गाजवणारी स्पर्धक म्हणजे मीरा जगन्नाथ. सध्या बिग बॉस मराठीचं तिसरं पर्व सुरु असून या सीझनची सुरुवात झाल्यापासून सातत्याने चर्चेत येणारी स्पर्धक म्हणजे मीरा. सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन घरातील सदस्यांसोबत भांडण करणारी मीरा सध्या प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होत आहे. सुरुवातीच्या काळात तिचा स्वभाव अनेकांना खटकत होता. मात्र, बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकरांनी तिची कानउघडणी केल्यापासून मीराच्या स्वभावात कमालीचा बदल झाला आहे. विशेष म्हणजे तिचा हाच बदल प्रेक्षकांना भावत असून तिच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे. मीराच्या याच चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. मीराची मुख्य भूमिका असलेली एक वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

तुषार घाडीगावकर दिग्दर्शित 'तुझी माझी यारी' या नव्या कोऱ्या वेब सीरिजमध्ये मीरा जगन्नाथ झळकणार आहे. तिच्यासोबतच अभिनेत्री स्नेहल साळुंके स्क्रीन शेअर करणार आहे  या वेब सीरिजच्या माध्यमातून दोन मैत्रिणींच्या निखळ नात्यावर प्रकाश टाकला जाणार आहे.

Bigg boss 15: कोण आहे सर्वात महागडा स्पर्धक?; कोणाला मिळतंय सर्वात कमी मानधन

माणसाला जन्मतःच अनेक नाती लाभलेली असतात. त्याची निवड आपण केलेली नसते. मात्र, एक नातं असं असतं ज्याची निवड करण्याचा अधिकार आपल्याला अलतो. ते नातं म्हणजे मैत्री. ज्याला मित्र किंवा मैत्रीण नाही असा एकही माणूस जगात सापडणं तसं कठीण आहे. त्यामुळेच मैत्रीचं हे खास नात 'तुझी माझी यारी'मधून उलगडलं जाणार आहे.

दरम्यान, या सीरिजची निर्मिती फिल्मी आऊल स्टुडिओने केली असून निर्मिती तेजस नागवेकर यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वीच या सीरिजचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं होतं. त्यामुळे या सीरिजची प्रेक्षकांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र, ही सीरिज येत्या ७ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. सुमेध किर्लोस्कर लिखित या चार भागांच्या वेबसीरिजमध्ये मैत्रीचे अनोखे रंग पाहायला मिळणार आहेत.

Web Title: bigg boss marathi 3 fame mira Jagannath new web series tuzi mazi yaari coming soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.