'बिग बॉस मराठी' सीझन 1 मधून स्मिता गोंदकर हे नाव घराघरात पोहोचले. 'पप्पी दे पारुला' म्हणत तिने रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.  स्मिता गोंदकर विविध सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत रसिकांच्या मनात घर केलं आहे. सिनेमासोबतच आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.


सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. सध्या स्मिता ऑस्ट्रियामध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते. इन्स्टाग्राम अकाऊंटवर ती ऑस्ट्रिया ट्रिपचे फोटो शेअर करते आहे.


स्मिता गोंदकरने काही दिवसांपूर्वी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत हॉलिवूडमध्ये काम करायचे असल्याचे सांगितले व पुढे म्हणाली की,' कलाकारांनी कधीच स्वतःला सीमित ठेवले नाही पाहिजे.

कलाकारांनी स्वतःमध्ये बदल करत नवनवीन गोष्टी करायला पाहिजेत. माझे तर हॉलिवूडमध्ये काम करायचे स्वप्न आहे. हे माझे खूप आधीपासूनचे स्वप्न आहे आणि लवकरच मी खूप मेहनत करून आणि प्रामाणिकपणे काम करून हे स्वप्न सत्यात पूर्ण करणार आहे. 


Web Title: Bigg Boss fame Smita Gondkar enjoys vacation in austria
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.