हिंदी आणि मराठी सिनेमा तसेच मालिकांमध्ये आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री रेशम टिपणीस 'बिग बॉस' मराठी रिएलिटी शोमुळे चर्चेत आली. या शोमधील तिचा बोल्ड, बिनधास्त व फटकळ अंदाज प्रेक्षकांना आवडला होता. रेशम जीवनातील कुठलीगी खासगी गोष्ट असो किंवा मग भूमिका तिला जे आवडते ते करते. त्यामुळे तिचे चाहते तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.

बिग बॉसच्या घरात रेशम टिपणीस व राजेश शृंगारपुरे नेहमी एकत्र असायचे आणि त्यांच्या वागण्यामुळे त्या दोघांच्या अफेयरची खूप चर्चा रंगली होती. मात्र रेशम बिग बॉसच्या घरात जाण्याच्या आधीपासून एका व्यक्तीला डेट करतेय. या व्यक्तीचं नाव आहे. संदेश किर्तीकर. रेशम व संदेश यांनी लग्न केलं नसलं तरी देखील त्यांच्या सोशल मीडियावर एकत्र फोटो पहायला मिळतात. 


रेशमने वयाच्या २० व्या वर्षी संजीव सेठ या अभिनेत्यासोबत १९९३ मध्ये लग्न केलं. मात्र काही कारणामुळे तिने २००० सालीघटस्फोट घेतला.

रेशम सिंगल मदर आहे, हे सर्वांनाच माहित आहे. तिला रिशिका आणि मानव अशी दोन मुलं आहेत.

 

आता रेशम गेल्या अनेक वर्षांपासून संदेशसोबत रिलेशनशीप आहे. रेशम बॉयफ्रेंड संदेशला 'मब्स' या नावानं हाक मारते. तसंच संदेश रेशमपेक्षा ५ वर्षांनी लहान असल्याचं देखील समजतंय. रेशम ४३ वर्षांची असून संदेश ३९ वर्षांचा आहे. 


संदेश रेशमच्या फेसबुकवर अनेक फोटोंवर कमेंट करताना दिसतो. संदेश आणि रेशम गेल्या 3 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात आणि गेली अडीच वर्षे ते डेट करत आहेत.

रेशम आणि त्याच्या नात्याला अनेक वर्ष झाली असूनही त्यांनी अद्याप लग्न करण्याचा निर्णय घेतलेला नाही. 


Web Title: Bigg Boss Fame Resham Tipnis dating this person, see their photos
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.