ठळक मुद्देमला खूप चांगल्या आठवणी दिल्याबद्दल भूतानचे मी आभार मानतो. भूतान आणि भूतानमधील लोक दोघंही खूपच चांगले आहेत. मी नुकताच भूतानमधून परत आलो. तिथे मी एक आठवडाभर भ्रमंती केली.

सोशल मीडियावर सेलिब्रिटी मंडळी बरीच अ‍ॅक्टिव्ह असतात. आपापल्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी, आगामी सिनेमा, त्यांचे ट्रेलर, पोस्टर याची प्रत्येक गोष्ट ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससह शेअर करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट फॅन्सशी संवाद साधता येत असल्याने दिवसेंदिवस अधिकाधिक सेलिब्रिटी इथं रुळल्याचं आपल्याला पाहायला मिळते. या माध्यमातून रसिकांच्या प्रतिक्रिया थेट जाणून घेता येत असल्याने सेलिब्रेटी सोशल मीडियाला प्राधान्य देत आहेत. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अभिनेता भूषण प्रधान. 

आपल्या फॅन्सशी भूषण प्रधान कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्ट असतो. आपले आगामी सिनेमाचे फोटो, फिटनेसचे व्हिडिओ, हॉलिडेचे फोटो भूषण फॅन्ससाठी सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्यामुळे त्याला त्याचे फॅन्सदेखील मोठ्या संख्येने सोशल मीडियावर फॉलो करतात. नुकताच भूषणने त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून या फोटोत भूषण खूपच छान दिसत आहे. 

या फोटोत भूषणच्या चेहऱ्यावर छानसे हास्य आपल्याला पाहायला मिळत आहे. या फोटोसह भूषणने एक पोस्टसुद्धा शेअर केली आहे. त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मला खूप चांगल्या आठवणी दिल्याबद्दल भूतानचे मी आभार मानतो. भूतान आणि भूतानमधील लोक दोघंही खूपच चांगले आहेत. मी नुकताच भूतानमधून परत आलो. तिथे मी एक आठवडाभर भ्रमंती केली. तिथले फोटो, व्हिडिओ, तिथल्या गोष्टी तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करणार आहे. 

सतरंगी रे', 'मिस मॅच', 'टाईमपास', 'टाईमपास-2', 'कॉफी आणि बरंच काही' अशा विविध सिनेमांमध्ये भूषणनं भूमिका साकारल्या आहेत. या सिनेमांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरल्या होत्या. पिंजरा या मालिकेमुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. मराठीत मिळालेल्या यशानंतर भूषण आता बॉलिवूडकडे वळला आहे. तो सिमी जोसेफ यांच्या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत एन्ट्री करणार आहे. त्याने याबाबत काही दिवसांपूर्वीच मीडियाशी बोलताना सांगितले होते. या चित्रपटात तो अभिनेत्री रायमा सेनसोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.


Web Title: Bhushan Pradhan visited Bhutan shares his feeling for this nation on Instagram
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.