भरत जाधवने अंकुश चौधरीला अशा दिला वाढदिवसाच्या शुभेच्छा, पोस्ट केला त्यांचा जुना फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 11:18 AM2021-02-01T11:18:49+5:302021-02-01T11:20:37+5:30

अंकुश आणि भरत यांचा हा फोटो जवळजवळ २०-२५ वर्षांपूर्वीचा असावा असे आपल्याला हा फोटो पाहून दिसत आहे. या फोटोत त्या दोघांना ओळखणे देखील अशक्य होत आहे.

bharat jadhav shares old picture of him and ankush choudhary | भरत जाधवने अंकुश चौधरीला अशा दिला वाढदिवसाच्या शुभेच्छा, पोस्ट केला त्यांचा जुना फोटो

भरत जाधवने अंकुश चौधरीला अशा दिला वाढदिवसाच्या शुभेच्छा, पोस्ट केला त्यांचा जुना फोटो

googlenewsNext
ठळक मुद्देअंकुश आणि भरत यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोला खूप सारे लाईक्स मिळाले असून या फोटोवर त्यांचे चाहते भरभरून कमेंट देखील करत आहेत. तसेच भरतने अंकुशसोबतचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

अंकुश चौधरी आणि भरत जाधव यांच्या मैत्रीविषयी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. त्या सगळ्यांची मैत्री ही खूपच जुनी आहे. आज भरत आणि अंकुश मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्या दोघांनी चित्रपटसृष्टीत एंट्री देखील केली नव्हती. तेव्हापासून त्या दोघांची मैत्री आहे. अंकुशचा काल वाढदिवस होता. या निमित्ताने आपल्या लाडक्या मित्राला शुभेच्छा देताना भरतने अंकुश आणि त्याचा एक जुना फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

अंकुश आणि भरत यांचा हा फोटो जवळजवळ २०-२५ वर्षांपूर्वीचा असावा असे आपल्याला हा फोटो पाहून दिसत आहे. या फोटोत त्या दोघांना ओळखणे देखील अशक्य होत आहे. अंकुश आणि भरत यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोला खूप सारे लाईक्स मिळाले असून या फोटोवर त्यांचे चाहते भरभरून कमेंट देखील करत आहेत. तसेच भरतने अंकुशसोबतचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

आली लहर केला कहर या कार्यक्रमात अंकुश आणि भरत यांनी हजेरी लावली होती. त्यावेळेचा हा व्हिडिओ असून या व्हिडिओत भरतच्या गोड गोजिरी लाजलाजिरी या प्रसिद्ध गाण्यावर अंकुश आणि भरत थिरकताना दिसत आहेत. श्रीमंत दामोदरपंत या नाटकातील गोड गोजिरी... या गाण्यावरचे नृत्य रसिकांना चांगलेच भावले होते. अंकुश आणि भरतने या गाण्यावर धरलेला ताल रसिकांना चांगलाच भावत आहे. हा व्हिडिओ ३२ हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 

 भरत जाधवने रंगमंचाद्वारे त्याच्या अभिनयकारकिर्दीला सुरुवात केली. आज मराठीतील सुपरस्टार अशी त्याची ओळख आहे. त्याने अनेक मराठी मालिका, नाटक, चित्रपटांमध्ये काम केले आहे. सुखी माणसाचा सदरा ही मालिका त्याची मालिका सध्या त्याच्या फॅन्सना प्रचंड आवडत आहे. तर अंकुशने एकापेक्षा एक चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. 

अंकुश चौधरी, केदार शिंदे आणि भरत जाधव ही लोकप्रिय तिकडी असून केदार शिंदेच्या ऑल द बेस्ट या नाटकात अंकुश आणि भरत जाधवने काम केले होते. 

Web Title: bharat jadhav shares old picture of him and ankush choudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.