नो मेकअप लूकमध्ये अशी दिसते भाग्यश्री मोटे, फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 12:40 PM2020-02-24T12:40:16+5:302020-02-24T12:40:52+5:30

भाग्यश्री मोटेने नो मेकअप लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Bhagyashree Mote shared No Makeup Look, Photo viral on social media | नो मेकअप लूकमध्ये अशी दिसते भाग्यश्री मोटे, फोटो होतोय व्हायरल

नो मेकअप लूकमध्ये अशी दिसते भाग्यश्री मोटे, फोटो होतोय व्हायरल

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडली आहे. नुकताच तिने नो मेकअप लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

बॉलिवूड व मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री विना मेकअपमधील फोटो शेअर करत असतात. त्यात आता अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने नो मेकअप लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. विना मेकअप लूक असला तरी तिच्या फोटोवर चांगली दिसत असल्याच्या कमेंट्स येत आहेत. 

भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती 'माझ्या बायकोचा प्रियकर', 'काय रे रास्कला' अशा चित्रपटात दिसली होती.


भाग्यश्रीने तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे. यात तिने आपल्या मादक अदांचा जलवा दाखवला होता. भाग्यश्री लवकरच तमीळ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती बॅडमिंटनपटूची भूमिका साकारताना दिसणार आहे.


भाग्यश्री मोटे लवकरच एका बॉलिवूड चित्रपटामधून लोकांसमोर येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Bhagyashree Mote shared No Makeup Look, Photo viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.