#BestOf2018 : या वर्षांत या अभिनेत्री ठरल्या सुपरहिट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 02:26 PM2018-12-24T14:26:57+5:302018-12-24T14:42:08+5:30

2018 मध्ये अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. जाणून घ्या या वर्षांत कोणत्या अभिनेत्रींनी जिंकले प्रेक्षकांचे मन...

Best Of 2018: Best Marathi Actress of 2018 | #BestOf2018 : या वर्षांत या अभिनेत्री ठरल्या सुपरहिट

#BestOf2018 : या वर्षांत या अभिनेत्री ठरल्या सुपरहिट

googlenewsNext
ठळक मुद्देआपल्या खऱ्या आईला भेटण्याची त्याला ओढ लागते. या सगळ्यात त्याला अनेक वर्षं आपला मुलगा म्हणून सांभाळलेल्या आईची काय अवस्था होते हे देविकाने खूप चांगल्याप्रकारे सादर केले आहे.

वेगळ्या आशयाचे अनेक चित्रपट प्रेक्षकांना 2018 मध्ये पाहायला मिळाले. या चित्रपटातील अभिनेत्रींनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आपला एक वेगळा ठसा उमटवला.

देविका दफ्तरदार - नाळ 
आपल्या मुलावर प्रचंड प्रेम करणाऱ्या आईची भूमिका देविका दफ्तरदारने नाळ या चित्रपटात साकारली आहे. दत्तक घेतलेल्या मुलाला ती स्वतः पेक्षा जास्त जपत असते. तो दत्तक आहे याची जाणीव देखील त्याला कधी करून देत नाही. पण त्याला तो दत्तक आहे हे कळल्यानंतर तो आईपासून दूर व्हायला लागतो, आपल्या खऱ्या आईला भेटण्याची त्याला ओढ लागते. या सगळ्यात त्याला अनेक वर्षं आपला मुलगा म्हणून सांभाळलेल्या आईची काय अवस्था होते हे देविकाने खूप चांगल्याप्रकारे सादर केले आहे.

मुक्ता बर्वे - मुंबई पुणे मुंबई 3 
मुंबई पुणे मुंबई 3 या चित्रपटात मुक्ताने करियरच्या मागे धावणाऱ्या गौरीची भूमिका साकारली आहे. पण एका क्षणाला करियर आणि मूल यांमध्ये ती मुलाची निवड करते. मुलाच्या जन्मासाठी माहेरी आल्यानंतर पतीला मिस करणारी गौरी, गरोदरपणातही आपले करियर सांभाळणारी गौरी प्रेक्षकांना चांगलीच भावते. मुक्ताने या भूमिकेला चारचाँद लावले आहेत.

वैदही परशुराम - आणि डॉ. काशिनाथ घाणेकर 
आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या चित्रपटात वैदही परशुरामने कांचन घाणेकर यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. अल्लड वयातील त्यांची निरागसता, वयाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या वेगवेगळ्या छटा वैदही परशुरामने खूप चांगल्या प्रकारे पडद्यावर मांडल्या आहेत.

 

नंदिता धुरी - आणि डॉ. काशिनाथ घाणेकर 
आणि डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या पत्नी इरावती यांच्या भूमिकेत नंदिता धुरी यांनी एक जिवंतपणा आणला आहे. आपल्या पतीला साथ देणारी पण त्याचसोबत त्याच्या वागणुकीमुळे हताश झालेली स्त्री त्यांनी खूपच चांगल्याप्रकारे सादर केली आहे.

 

 


क्रांती रेडकर - ट्रकभर स्वप्न
आपल्या कुटुंबासाठी झटणाऱ्या स्त्रीची भूमिका क्रांती रेडकरने ट्रकभर स्वप्न या चित्रपटात साकारलेली आहे. ग्लॅमरस नसलेली अतिशय साधी स्त्री क्रांतीने खूपच चांगल्या प्रकारे साकारली आहे. 

अश्विनी गिरी - लेथ जोशी 
लेथ जोशी या चित्रपटात आपल्या पतीची नोकरी गेल्यानंतर घाबरून न जाता प्रत्येक संकटाचा सामना करणाऱ्या स्त्रीची भूमिका अश्विनी गिरी यांनी साकारली आहे. काळाप्रमाणे पुढे जाणारी, नव्या गोष्टींना स्वीकारणारी पण त्याचसोबत आपले मूल्य जपणारी व्यक्तिरेखा अश्विनी गिरीने खूप चांगल्याप्रकारे साकारली आहे. 

कल्याणी मुळ्ये -  न्यूड 
न्यूड या चित्रपटात कल्याणी मुळ्येने यमुना ही व्यक्तिरेखा साकारली आहे. आपल्या मुलाला शिक्षण देण्यासाठी ती एका कॉलेजमध्ये न्यूड मॉडेल म्हणून काम करत असते. पैशांची गरज असल्याने ती या व्यवसायात ओढली जाते पण याच व्यवसायावर पुढे जाऊन प्रेम करायला लागते. तिच्या आयुष्यातील विविध छटा कल्याणी मुळ्येने न्यूड या चित्रपटात मांडल्या आहेत. 

तृप्ती तोरडमल - सविता दामोदर परांजपे 
सविता दामोदर परांजपे या चित्रपटात तृप्ती तोरडमलने कुसूम आणि सविता या दोन्ही व्यक्तिरेखा तितक्याच ताकदीने उभ्या केल्या आहेत. अंगात कुसूम गेल्यानंतर तिच्या आवाजात होत असलेला बदल तिने खूपच चांगल्याप्रकारे दाखवला आहे.

Web Title: Best Of 2018: Best Marathi Actress of 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.