Apurva Kawade is new face to be seen in Marathi cinema | मराठी चित्रपटसृष्टीत झळकणार आणखीन एक नवा चेहरा
मराठी चित्रपटसृष्टीत झळकणार आणखीन एक नवा चेहरा

मराठी सिनेइंडस्ट्रीत दररोज नवनवीन चेहरे दाखल होत आहेत. त्यात आता आणखीन एक नवा मराठमोळा चेहरा सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. ती म्हणजे अपूर्वा कवडे. अपूर्वाने ‘मिस फॅब’ सौंदर्यस्पर्धेत ३रा क्रमांक पटकावत ‘ग्लॅमर’च्या दुनियेत पदार्पण केलं. आता चित्रपट व म्युझिक अल्बममध्ये आपलं कौशल्य दाखवण्यासाठी ती सज्ज झाली आहे.

अनेक मॉडेल्सचा सौंदर्य स्पर्धा व फॅशन शोज नंतर पुढचा टप्पा अभिनय क्षेत्र असते. अपूर्वा कवडेचा अभिनय असलेला ‘चिंध्या’ नावाचा लघुपट २०१७ साली सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी नॉमिनेट झाला होता. तिने नुकतंच एक हिंदी चित्रपटात काम केलंय. ‘शुभरात्री’ या चित्रपटात ती प्रमुख भूमिका करीत असून तिच्यासोबत मेहुल गांधी व शाहिद मल्ल्या महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. वर्षा उसगावकर व अनुपसिंग ठाकूर सारख्या दिग्गज कलाकारांसोबत तिला काम करण्याची संधी मिळाली व तिच्या अनुभव संपन्नतेत भर पडली याबद्दल ती खूश आहे.
अपूर्वा एक चांगली अभिनेत्री तर आहेच परंतु ती उत्तम नृत्यांगना सुद्धा आहे. लहानपणापासूनच नृत्याची आवड असणाऱ्या अपूर्वाने बॉलिवूड डान्सिंग स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेले गणेश आचार्य यांच्याकडे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलंय. त्यामुळे तिला म्युझिक अल्बमसाठी विचारणा झाली. तिने ‘सोनिया रांझणा’ हा हिंदी म्युझिक अल्बम केला, ज्यात तिचा अभिनय, नृत्य यांचा संगम बघायला मिळतो. तसेच तिचा अजून एक नवाकोरा मराठी म्युझिक अल्बम येऊ घातलाय. ‘फंडूगिरी’ असे आजच्या पिढीला भावणारे नाव असलेला हा म्युझिक अल्बम मराठीतील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहन सातघरे दिग्दर्शित करीत आहेत. 
 


Web Title: Apurva Kawade is new face to be seen in Marathi cinema
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.