So Cute अभिनेता अंशुमन विचारेच्या लेकीचा हा व्हिडीओ झाला प्रचंड व्हायरल, कोरोनाकाळात चिमुरडीने धरला 'या' गोष्टीचा हट्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 02:55 PM2020-07-24T14:55:36+5:302020-07-24T14:59:13+5:30

अभिनेता अंशूमन विचारे लॉकडाऊनमध्ये कुटुंबासह एन्जॉय करताना दिसला. आपल्या लोकीसोबत मजा मस्ती करताना पाहायला मिळाला. अन्वी असे अंशूमनच्या लेकीचे नाव आहेय  कोरोनाकाळात ''पार्टीलाच जायचे'' असा हट्ट ही चिमुरडी करताना पाहायला मिळते.

Anshuman Vichare's Daughter ANVI Saying "Not To Go Out For Party | So Cute अभिनेता अंशुमन विचारेच्या लेकीचा हा व्हिडीओ झाला प्रचंड व्हायरल, कोरोनाकाळात चिमुरडीने धरला 'या' गोष्टीचा हट्ट

So Cute अभिनेता अंशुमन विचारेच्या लेकीचा हा व्हिडीओ झाला प्रचंड व्हायरल, कोरोनाकाळात चिमुरडीने धरला 'या' गोष्टीचा हट्ट

googlenewsNext

बॉलीवुडमध्ये आज अनेक कलाकारांची मुलं जन्माला येताच तुफान पब्लिसिटी मिळवताना दिसतात. यात नवाब सैफ अली खानचा आणि करिना कपूरचा मुलगा तैमूर आघाडीवर आहे. या स्टारकिडसनाही टक्कर देणारे मराठीतील स्टारकिडसचे व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. लॉकडाऊनमध्ये मराठी कलाकारांच्या चिमुकल्यांनी सोशल मीडियावर अक्षरक्षः धुमाकुळ घातला. त्यांचे व्हिडीओ पाहून चाहतेही रिफ्रेश झाले. 


राहुल देशपांडेच्या लेकीचा अंदाज पाहून चाहतेही म्हणाले कमाल है.....याच पाठोपाठ आणखीन एका अभिनेत्याच्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला.  आपल्या विनोदाने सगळ्यांना हसवत ठेवणारा अभिनेता अंशुमन विचारे जेवढा लोकप्रिय आहे, तेवढीच लोकप्रिय त्याची मुलगी सुद्धा आहे. आणि सध्या त्याच्या मुलीचे असे मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर रसिकांची प्रचंड पसंती मिळवत आहेत.

अभिनेता अंशूमन विचारे लॉकडाऊनमध्ये कुटुंबासह एन्जॉय करताना दिसला. आपल्या लोकीसोबत मजा मस्ती करताना पाहायला मिळाला. अन्वी असे अंशूमनच्या लेकीचे नाव आहेय  कोरोनाकाळात ''पार्टीलाच जायचे'' असा हट्ट ही चिमुरडी करताना पाहायला मिळते. यात चिमुरडीला आई कोरोनाकाळात पार्टी कशी करणार?  यावर समजावून सांगते. आईचे बोलणे या चिमुरडीनेही समजून घेतले आणि कोरोना गेल्यानंतर बाहेर फिरण्यापासून ते आईस्क्रीम खाण्यापर्यंत सगळे प्लॅनिंगच तिने बनवले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर रसिकांची तुफान पसंती मिळवत असून सारेच या चिमुरडीवर कौतुकाचा वर्षाव करत आहे.

Web Title: Anshuman Vichare's Daughter ANVI Saying "Not To Go Out For Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.