अभिनेता अनिकेत विश्वासराव गेल्या वर्षी १० डिसेंबरला अभिनेत्री स्नेहा चव्हाणसोबत विवाह बंधनात अडकले. त्या दोघांचे सोशल मीडियावर बऱ्याचदा फोटो पहायला मिळतात. नुकताच स्नेहाने तिच्या आईचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिची आई डान्स करताना दिसते आहे.

स्नेहा चव्हाण हिने सोशल मीडियावर आपल्या आईचा डान्स व्हिडिओ शेअर करत लिहिलं की,कोण म्हणेल ही माझी आई आहे. माझ्यापेक्षा दहा पट एनर्जी तिच्यात आहे. तसेच तिच्यात उत्साहही जास्त आहे. 
या व्हिडिओत स्नेहा चव्हाणची आई स्त्री सिनेमातील मिलेगी...मिलेगी या गाण्यावर दमदार डान्स करताना दिसत आहे. त्याचा डान्स पाहून सोशल मीडियावर त्यांचं सगळेजण कौतूक करत आहेत. 


अभिनेता अनिकेत विश्वासराव व अभिनेत्री स्नेहा चव्हाण १० डिसेंबर, २०१८ साली लग्नबेडीत अडकले. त्यांचा विवाह सोहळा नुकताच पुण्यातील एका रिसॉर्टमध्ये पार पडला. हा विवाह सोहळा कुटुंब, जवळचे नातेवाईक व इंडस्ट्रीतील काही निवडक मित्रमैत्रिणींच्या उपस्थित पार पडला.

अनिकेत व स्नेहा हृद्यात समथिंग समथिंग या चित्रपटात एकत्र झळकले होते. या चित्रपटातील त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली आहे.

स्नेहा चव्हाण यापूर्वी लाल इश्क चित्रपट व सोनी मराठी वाहिनीवरील हृदयात वाजे समथिंक मालिकेत झळकली आहे. तर अनिकेतने बऱ्याच मराठी सिनेमांमध्ये काम केले असून आता तो ये रे ये रे पैसा २ चित्रपटात झळकणार आहे.


Web Title: Aniket Vishwasrao mother in law dance video on instagram
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.