अभिनेत्री अमृता खानविलकर. सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. सोशल मीडियावर सक्रीय असलेली अमृता आपले फोटो आणि व्हिडीओ फॅन्ससह शेअर करत असते. ती आपल्या फॅन्सना कधीही निराश करत नाही.

दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसंच सेल्फी ती सोशल मीडियावर शेअर करते. तिचा प्रत्येक फोटो तिच्या फॅन्ससाठी खास असतो. त्यावर ते भरभरून लाइक्स आणि कमेंट्स देतात. नुकताच तिने फोटोशूटमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

एथनिक अंदाजामधील हा फोटो सध्या तिच्या फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. ब्लॅक आणि ब्राऊन कॉम्बिनेशनमधील साडी आणि ब्लाऊजमध्ये अमृताचे सौंदर्य आणखीनच खुलून गेले आहे. नेहमीप्रमाणे आपली अदा, सौंदर्य, फॅशन, स्टाइल आणि चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास अमृताच्सा या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. 

या फोटोवर फॅन्सकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे. मालिका, डान्स रिअॅलिटी शोसह हिंदी आणि मराठी सिनेमातही अमृताने काम केले आहे. गोलमाल, साडेमाडे तीन, नटरंग, झकास, धुसर, फक्त लढ म्हणा, सतरंगी रे, बाजी अशा मराठी सिनेमात अमृताने काम केले आहे. शिवाय बॉलीवुडमध्येही तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली. आपल्या अभिनयासह नृत्याने अमृताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. उत्तम डान्सर असलेल्या अमृताच्या नृत्यावर रसिक फिदा आहेत. अमृताने डान्स रिअॅलिटी शोमध्येही आपल्या नृत्याची जादू दाखवली आहे. 

'नच बलिये' या डान्स रिअॅलिटी शोचे जेतेपद पटकावल्यानंतर तिच्या डान्सने साऱ्यांनाच वेड लावलं. लवकरच अमृता पॉन्डेचेरी या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. सचिन कुंडलकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. कुंडलकर आणि तेजस मोडकने या सिनेमाची कथा लिहली आहे. या सिनेमाची कथा नेमकी काय हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र सिनेमाची तगडी स्टारकास्ट रसिकांना आकर्षित करेल. कारण यांत अमृता खानविलकरसह सई ताम्हणकर आणि वैभव तत्तववादी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 


Web Title: Amruta Khanvilkar’s this pic surely fall you in love with her, beauty with style mesmerized you
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.