माय बेबीगर्ल म्हणत अमृता खानविलकरने या चिमुरडीसोबत शेअर केला फोटो, या फोटोचीच रंगलीय चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 06:33 PM2021-04-26T18:33:30+5:302021-04-26T18:35:53+5:30

अमृतासोबतच दिसत असलेली ही गोंडस चिमुरडी कोण आहे याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

amruta khanvilkar shared picture with small baby and write my baby girl | माय बेबीगर्ल म्हणत अमृता खानविलकरने या चिमुरडीसोबत शेअर केला फोटो, या फोटोचीच रंगलीय चर्चा

माय बेबीगर्ल म्हणत अमृता खानविलकरने या चिमुरडीसोबत शेअर केला फोटो, या फोटोचीच रंगलीय चर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देअमृतासोबत दिसत असलेले हे बाळ खूपच गोंडस असल्याचे तिचे चाहते तिला सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत.

अमृता खानविलकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे कुटुंबियांचे फोटो, चित्रीकरणाच्यावेळेसचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिने सोशल मीडियावर नुकताच शेअर केलेला एक फोटो सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. अमृताने एका चिमुकल्या गोंडस बाळासोबत तिचा एक फोटो शेअर केला आहे आणि त्यासोबत माय बेबीगर्ल असा हॅशटॅग दिला आहे.

अमृतासोबतच दिसत असलेली ही गोंडस चिमुरडी कोण आहे याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. अमृतासोबत दिसणारी ही मुलगी तिची भाची असून याआधी देखील अमृता आणि तिचा पती हिमांशू मल्होत्राच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटला आपल्याला या बाळाचे फोटो अनेकवेळा पाहायला मिळाले आहेत.

अमृतासोबत दिसत असलेले हे बाळ खूपच गोंडस असल्याचे तिचे चाहते तिला सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत. अमृता आणि तिच्या भाचीचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून केवळ एका दिवसांत 70 हजाराहून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला आहे.

अमृता आता मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे..राजी', 'सत्यमेव जयते' , 'मलंग' अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत. मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमृता आणि पुष्कर जोगचा 'वेल डन बेबी' हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. 

Web Title: amruta khanvilkar shared picture with small baby and write my baby girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.