इतक्या कोटींच्या संपत्तीची मालकिण आहे अमृता खानविलकर, नवराही आहे अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 06:13 PM2020-06-22T18:13:29+5:302020-06-22T18:15:29+5:30

सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे.

Amruta Khanvilkar Net Worth Rs 30 Crore,Her husband is also an actor | इतक्या कोटींच्या संपत्तीची मालकिण आहे अमृता खानविलकर, नवराही आहे अभिनेता

इतक्या कोटींच्या संपत्तीची मालकिण आहे अमृता खानविलकर, नवराही आहे अभिनेता

googlenewsNext

वाजले की बारा म्हणत तमाम रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर. सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे. 

ती एका सिनेमासाठी १० लाख इतकं मानधन घेते. अमृता खानविलकरचा अभिनय आणि नृत्य यावर रसिक तितकेच फिदा आहेत. मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमृता खानविलकर हीची एकूण संपत्ती ही तीस कोटी रुपयांची असल्याचे सांगण्यात येते. तसेच अमृताकडे सध्या अनेक चित्रपट असल्याचेही सांगण्यात येत आहे.

सुरुवातीला एक डान्सर म्हणून प्रसिद्ध असलेली अमृता आता मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. अमृतानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या व्हेकेशनचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले  होते.फोटोमधील तिचा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहतेही  घायाळ होत असतात. 

Web Title: Amruta Khanvilkar Net Worth Rs 30 Crore,Her husband is also an actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.