Photo Alert ! अमृता खानविलकरचे झक्कास फोटोशूट पाहून व्हाल क्रेझी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 07:48 PM2021-06-18T19:48:32+5:302021-06-18T19:51:21+5:30

अभिनयासह फॅशन आणि स्टाईलबाबत अमृता खानविलकर तितकीच सजग आहे. ट्रेंडपेक्षा स्वतः एखाद्या स्टाईलमध्ये किती कम्फर्टेबल आहोत याला अधिक प्राधान्य देते.

Amruta Khanvilkar looks pretty as poses in a stunning yellow Dress | Photo Alert ! अमृता खानविलकरचे झक्कास फोटोशूट पाहून व्हाल क्रेझी

Photo Alert ! अमृता खानविलकरचे झक्कास फोटोशूट पाहून व्हाल क्रेझी

googlenewsNext

तमाम रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर.अमृता खानविलकरने आपले सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टाइलने  रसिकांवर मोहिनी घातली आहे. बऱ्याचदा अमृताची फॅशन आणि स्टाइल चर्चेचा विषय बनते.अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. 

अभिनयासह फॅशन आणि स्टाईलबाबत अमृता तितकीच सजग आहे. ट्रेंडपेक्षा स्वतः एखाद्या स्टाईलमध्ये किती कम्फर्टेबल आहोत याला अधिक प्राधान्य देते. हटके स्टाईल आणि फॅशनमधील स्वतःचे फोटो नेहमीच ती चाहत्यांसह शेअर करत सोशल मीडियावर वाहवा मिळवत असते. सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. 


नुकतंच अमृताने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोतील तिच्या अदांनी फॅन्सना क्लीन बोल्ड केले आहे.अगदी क्लासी लूकमध्ये तिनं हे फोटोशूट केलं असून यात ती कमालीची सुंदर दिसतेय. फॅन्सना या ड्रेसमधला तिचा अंदाज आवडला आहे. त्यांनी फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते. 

विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते. या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे. नेहमीच तिच्या  ग्लॅमरस लूकमुळे  सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरते.अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांच्या मनाचा ठाव घेत आहे. याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक अदांनी  रसिकांना घायाळ केलं होतं.

अमृताचा हटके आणि स्टायलिश अवतार पाहून स्टनिंग, अमेझिंग अशा कमेंट्स करत असल्याचे पाहायला मिळतंय. फोटोमध्ये अमृताने पिवळ्या रंगाचा फ्लोरल वन पीस परिधान केला आहे. शिवाय या ड्रेसला साजेसं अॅक्सेसरीज तिने परिधान केल्या आहेत. या ड्रेसमध्ये अमृताच्या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत. 

Web Title: Amruta Khanvilkar looks pretty as poses in a stunning yellow Dress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.