असं कसं ! लॉकडाऊनमध्ये पण फिटनेस इन्स्ट्रक्टर मराठी कलाकारांसह करतायेत वर्कआऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 10:02 AM2020-04-29T10:02:38+5:302020-04-29T10:21:22+5:30

लॉकडाउन झाल्यापासून रीमा आणि ब्रायन आपल्या फिटनेस फ्रिक विद्यार्थ्यांसाठी व्हिडीयोकॉलव्दारे रोज क्लासेस घेतात. ह्यात अर्थातच स्नेहलता वसईकर, हृता दुर्गुळे, प्राजक्ता माळी, स्पृहा जोशी अशा सेलिब्रिटींचा समावेश आहे.

Amruta Khanvilkar To Hruta Durgule:How Marathi celebs are working out during the lockdown without going to the gym | असं कसं ! लॉकडाऊनमध्ये पण फिटनेस इन्स्ट्रक्टर मराठी कलाकारांसह करतायेत वर्कआऊट

असं कसं ! लॉकडाऊनमध्ये पण फिटनेस इन्स्ट्रक्टर मराठी कलाकारांसह करतायेत वर्कआऊट

googlenewsNext

19 मार्चला सिनेसृष्टीने आपले सर्व शुटिंग, कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने गेला एक महिना सेलिब्रिटी घरी आहेत. सेलिब्रिटींच्या आयुष्यातला अविर्भाज्य भाग असतो, तो म्हणजे फिटनेस. पण कॉरन्टाइनच्या काळात सर्व जीम, फिटनेस स्टुडियोज बंद असल्याने सेलेब्स त्यांच्या इन्स्ट्रक्टरसोबत वर्कआऊट करू शकत नाहीत. पण सेलिब्रिटी फिटनेस इन्स्ट्रक्टर ह्यांनी ह्यावर तोडगा काढला आहे.  सेलिब्रिटी फिटनेस इन्स्ट्रक्टर सध्या वर्च्युअल क्लासेसव्दारे आपल्या विद्यार्थ्यांना फिट ठेवण्याचा प्रयत्न करतायत.

लॉकडाउन झाल्यापासून व्हिडीयोकॉलव्दारे रोज क्लासेस घेतले जात आहेत. ह्यात अर्थातच स्नेहलता वसईकर, हृता दुर्गुळे, प्राजक्ता माळी, स्पृहा जोशी अशा सेलिब्रिटींचा समावेश आहे. आपल्या  फिटनेस व्हिडीओद्वारे फिटनेस  ट्रेनिंग सेलिब्रेटी घेतात. “सध्या देशभरात करोना व्हायरसमूळे लॉकडाउन आहे. त्यामूळे जसं आपण आजारी पडू नये म्हणून वर्क फ्रॉर्म होम करणं किंवा घरीच राहणं गरजेच आहे. तसंच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही फिट राहणंही तितकेच गरजेच आहे. 

कॉरन्टाइनमध्ये थोडा वेळ मिळालाय, तर आता काही दिवस स्वत:कडे पाहण्याचा संकल्प सोडलेल्या नवोदितांनाही  फ्री क्लासेसव्दारे प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतायेत. 


 “सततच्या धावपळीच्या आयुष्यात मग ते सेलिब्रिटी असो की, सामान्य माणूस आपल्याला स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. त्यामूळे ह्या लॉकडाउनचा फिटनेसव्दारे स्वत:वर सकारात्मक बदल घडवून आणण्याची हिच वेळ आहे. 

Web Title: Amruta Khanvilkar To Hruta Durgule:How Marathi celebs are working out during the lockdown without going to the gym

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.