Amruta Khanvilkar enjoying her vacation in New York City | अमृता खानविलकर पडली या शहराच्या प्रेमात
अमृता खानविलकर पडली या शहराच्या प्रेमात

ठळक मुद्देतिने तिचा एक खूप छान फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्यासोबत तिने लिहिले आहे की, तू जर एक व्यक्ती असतास तर तुला मी नक्कीच अलिंगन दिले असते. अनेकवेळा तुम्हाला चांगली ठिकाणे पाहायला मिळत नाहीत. पण काही वेळी अतिशय उत्कृष्ट ठिकाणे तुमच्यातील चांगली गोष्ट जगासमोर आणतात. मी या शहराला गुडबाय करत असली तरी लवकरच तुला भेटायला पुन्हा आणि पुन्हा येणार आहे. 

वाजले की बारा म्हणत तमाम रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. आज मालिका, डान्स रिअॅलिटी शोसह हिंदी आणि मराठी सिनेमातही अमृताने तिच्या मेहनतीच्या जोरावर एक अढळ स्थान निर्माण केले आहे. 'गोलमाल', 'साडेमाडे तीन', 'नटरंग', कट्यार काळजात घुसली, 'झकास', 'धुसर', 'फक्त लढ म्हणा', 'सतरंगी रे', 'बाजी' अशा मराठी सिनेमात तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 

आपल्या अभिनयासह नृत्याने अमृताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. उत्तम डान्सर असलेल्या अमृताच्या नृत्यावर रसिक फिदा आहेत. अमृताने डान्स रिअॅलिटी शोमध्येही आपल्या नृत्याची जादू दाखवली आहे. 'नच बलिये' या डान्स रिअॅलिटी शोचे जेतेपद पटकावल्यानंतर तिच्या डान्सने साऱ्यांनाच वेड लावलं. आज मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते. तिने मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये देखील चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. अमृता नुकतीच व्हेकेशनसाठी न्यूयॉर्कला गेली होती. ती तिथून तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असून आपल्या व्हेकेशनविषयी आपल्या चाहत्यांना माहिती देत आहे. ती या शहराच्या अक्षरशः प्रेमात पडली असल्याचे तिने इन्स्टाग्रामद्वारे तिच्या चाहत्यांना सांगितले आहे. तिने तिचा एक खूप छान फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्यासोबत तिने लिहिले आहे की, तू जर एक व्यक्ती असतास तर तुला मी नक्कीच अलिंगन दिले असते. अनेकवेळा तुम्हाला चांगली ठिकाणे पाहायला मिळत नाहीत. पण काही वेळी अतिशय उत्कृष्ट ठिकाणे तुमच्यातील चांगली गोष्ट जगासमोर आणतात. मी या शहराला गुडबाय करत असली तरी लवकरच तुला भेटायला पुन्हा आणि पुन्हा येणार आहे. 

अमृताच्या इन्स्टाग्रामवरील या पोस्टला तिच्या चाहत्यांनी भरभरून लाइक्स दिल्या असून अनेकांनी यावर कमेंट केले आहे. 

गेले वर्षं अमृतासाठी खूपच खास होते. 'राझी', 'सत्यमेव जयते' या हिंदी सुपरहिट चित्रपटांमुळे आणि 'डेमेज्ड' या वेबसीरिजमुळे तिला बॉलिवूडमध्ये नवी ओळख प्राप्त झाली आहे. यामुळे केवळ मराठीच नव्हे तर अमराठी लोकांचे देखील तिला प्रेम मिळत आहे.  


Web Title: Amruta Khanvilkar enjoying her vacation in New York City
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.