Amrita Khanvilkar will be seen with John Abraham after Karan Johar! | करण जोहर नंतर जॉन अब्राहम सोबत झळकणार अमृता खानविलकर!
करण जोहर नंतर जॉन अब्राहम सोबत झळकणार अमृता खानविलकर!
मराठी रसिकांना आपल्या अभिनयाने आणि नृत्याने अक्षरक्षः वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर फक्त मराठीच नाहीतर बॉलिवूडमध्येही तिने स्वतःला सिद्ध केले आहे.आगामी काळात मराठी सिनेमासोबतच काही हिंदी सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहेत.बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमात झळकलेली अमृता आता पुन्हा एका नवीन सिनेमात वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.बॉलिवूडचा हँडसम हंक जॉन अब्राहामच्या "डार्क अॅक्शन थ्रिलर" सिनेमात अमृता वेगळ्मयाच अंदाजात पाहायला मिळणार आहे. २०१८ मध्ये अमृता आपल्याला  एकामागोमाग एक हिंदी सिनेमामध्ये काम करताना दिसणार आहे. नुकतेत तिने  "राज़ी" सिनेमाचंही शूटिंग पूर्ण केले आहे.राजी सिनेमाची प्रदर्शनाची तारिख अद्याप ठरलेली नाही.राजी सिनेमानंतर आता तिने नवीन हिंदी प्रोजेक्ट हाती घेतला आहे.त्यामुळे सद्धा आमृताला हिंदी सिनेमांची लॉटरीच लागली आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.अमृताने अभिनेता मनोज बाजपेयी सोबतचा फोटो अमृताने शेअर करताच तिच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.नवीन सिनेमात अमृता मनोज बाजपेयी आणि जॉन अब्राहमसह झळकणार आहे. दिग्दर्शक निखिल अडवाणी या सिनेमाची निर्मिती करणार आहे.तसेच "एक व्हिलन" ह्या चित्रपटाचा लेखक मिलाप झवेरी हा सिनेमा दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे.जॉन अब्राहम, मनोज बाजपेयी आणि अमृता ह्यांच्या नवीन हिंदी सिनेमाच्या घोषणेमुळे अमृताच्या चाहत्यांमध्ये वेगळाच उत्साह निर्माण झालेला दिसत आहे. डार्क अॅक्शन थ्रिलर अशा थाटणीचा हा सिनेमा असून त्यात अमृताची काय भूमिका असेल ह्याचीच उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे.
अमृता मराठी, हिंदीमधील विविध शोमध्येही बिझी असते.बिझी शेड्युअलमधून वेळात वेळ काढुन ती सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. कायमच ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. काही दिवसापूर्वी तिने शेअर केलेला फोटो सध्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोत ती सुंदर दिसत असून तिचा हटके लूक फॅन्सना भावतो आहे.या फोटोत अमृताने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.अमृता स्टायलिश हे सा-यांना माहिती आहे.तिच्या स्टाईलवर सारेच फिदा असतात. त्यासाठी तिला विविध पुरस्कारही मिळालेत.तिच्या नव्या हिरव्या ड्रेसमधील फोटोच्या निमित्ताने फॅन्सना तिची हटके स्टाईल दिसते. हिरव्या ड्रेसमध्ये ती जणू काही फुलपाखरु असल्याप्रमाणे वाटत आहे.तिची ही अदा कुणालाही घायाळ करणारी अशीच आहे.  

Web Title: Amrita Khanvilkar will be seen with John Abraham after Karan Johar!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.