अमोल पालेकर, रिंकू राजगुरू आणि उपेंद्र लिमये यांचा "२०० - हल्ला हो" हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 04:34 PM2021-08-18T16:34:56+5:302021-08-18T16:34:56+5:30

२००-हल्ला हो" ही गोष्ट आहे, २०० दलित स्त्रियांची ज्यांनी एकत्र येऊन  गुंडगिरी करणाऱ्या टोळी, लुटेरे आणि बलात्काऱ्यांविरुद्ध  कोर्टामध्येच कायदा आणि न्याय स्वतःच्या हातात घेतला.

Amol Palekar and Rinku Rajguru“200 Halla Ho”? On This Date You Can Start Streaming The Film | अमोल पालेकर, रिंकू राजगुरू आणि उपेंद्र लिमये यांचा "२०० - हल्ला हो" हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होणार

अमोल पालेकर, रिंकू राजगुरू आणि उपेंद्र लिमये यांचा "२०० - हल्ला हो" हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होणार

googlenewsNext

सार्थक दासगुप्ता दिग्दर्शित, चित्रपटामध्ये, अमोल पालेकर, रिंकू राजगुरू आणि उपेंद्र लिमये, वरूण सोबती, साहील खत्तर, सलोनी बत्रा आणि इंद्रनील सेनगुप्ता यांच्या भूमिका आहेत.zee5 च्या "२००- हल्ला हो" चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून, प्रेक्षकांची उत्कंठा फारच वाढली आहे. कारणही तसेच आहे, ते म्हणजे अमोल पालेकर यांचे बऱ्याच काळानंतर पडद्यावर झालेले पुनरागमन, सत्यघटनेवर प्रेरित दमदार कथानक.सार्थकी दासगुप्ता दिग्दर्शित, "२००-हल्ला हो" ही गोष्ट आहे, २०० दलित स्त्रियांची ज्यांनी एकत्र येऊन  गुंडगिरी करणाऱ्या टोळी, लुटेरे आणि बलात्काऱ्यांविरुद्ध  कोर्टामध्येच कायदा आणि न्याय स्वतःच्या हातात घेतला.

ट्रेलरमध्ये कलाकारांनी साकारलेल्या दमदार भूमिकेची झलक दिसते. सत्य घटनेवर आधारित या कथेमध्ये स्त्रियांना न्याय मिळवण्यासाठी, कोणत्या परिस्थितीमध्ये हा लढा लढण्याची ताकद मिळाली आणि निर्णय घेतला याचे अतिशय सुरेख चित्रण केले आहे.या चित्रपटामध्ये, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, सैराट फेम रिंकू राजगुरू आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेते  उपेंद्र लिमये अशी तगडी स्टार कास्ट असून हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये रिलीज होणार आहे.

अमोल पालेकर म्हणतात, "मला कथेमधील जाती व्यवस्थेवर भाष्य करणारा धागा आवडला  जो भारतीय चित्रपटांमध्ये आधी फार दिसायचा नाही. तसेच, जातीची दडपशाहीला बळी पडलेल्या स्त्रियांनी न डगमगता केलेला संघर्ष, हे तथ्य फार आवडले. जातीयवाद आणि पुरुषप्रधान संस्कृतीविरुद्ध ऍस्ट्रोसिटीसाठी  आवाज उठवणाऱ्या या स्त्रियांना हे एक अभिवादन आहे. चित्रपट सत्यघटनेवर आधारित असल्यामुळे मला काम करायला अधिक छान वाटले. माझे रिटायर्ड दलित न्यायाधीशाचे पात्र आम्ही सखोल चर्चा करून रंगवल्यामुळे त्याला अनेक कंगोरे आहेत.

 रिंकू राजगुरू म्हणते, " ही कथा सत्यघटनेवर आधारित असल्यामुळे , मला माझे पात्र हे स्त्रियांनी मिळवलेल्या न्यायाबद्दल जागरूकता पसरवण्याची संधी आहे असे वाटले. स्वतःसाठी आणि इतरांसाठी बोलणे किती महत्त्वाचे आहे हे देखील या कथेतून आपल्याला कळते. सार्थक सरांनी (चित्रपटाचे दिग्दर्शक) जेव्हा पहिल्यांदा मला ही कथा ऐकवली तेव्हाच मला कथेतील वास्तवाने हलवून टाकले. दलित स्त्रिया कशा रोज भरडल्या जात होत्या, पण त्याविरुद्ध कोणीही आवाज उठवत नाही याचे मला फार वाईट वाटले. माझं रक्त अक्षरशः खवळले होते! म्हणूनच मी हे पात्र साकारणार आहे, जे स्वतःसाठी आणि इतरांसाठी आवाज उठवते."

 
 

Web Title: Amol Palekar and Rinku Rajguru“200 Halla Ho”? On This Date You Can Start Streaming The Film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.