LockDown मध्ये विना मेकअप फोटो शेअर करत तेजस्विनी पंडित म्हणाली.....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 02:39 PM2020-05-23T14:39:02+5:302020-05-23T14:39:32+5:30

. तेजस्विनीने स्वतः हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तेजस्विनीचा या फोटोतील हटके अंदाज साऱ्यांना भावतो आहे.

All The Lovers Of ‘No-Makeup’ Make-up, Bookmark tejaswini pandit During Lockdown-SRJ | LockDown मध्ये विना मेकअप फोटो शेअर करत तेजस्विनी पंडित म्हणाली.....

LockDown मध्ये विना मेकअप फोटो शेअर करत तेजस्विनी पंडित म्हणाली.....

googlenewsNext

सध्या लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त असलेले सर्व कलाकार मंडळी सोशल मीडियावर मात्र तुफान अॅक्टीव दिसत आहेत.चाहत्यांसह संपर्क साधण्यासाठी सोशल मीडिया हे उत्तम माध्यम म्हणून अनेक सेलिब्रेटी त्यांच्या मनातील विविध गोष्टी सोशल मीडियार शेअर करत आहेत. मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे असे सिनेमा, विविध नाटकं आणि १०० डेज सारख्या मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे रसिकांसह तेजस्विनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री बनली आहे. सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी तेजस्विनी सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव असते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्ससह संवाद साधत असते. शिवाय आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्सबरोबर शेअर करत असते. तेजस्विनीचा असाच एक फोटो सध्या तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे. तेजस्विनीने स्वतः हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तेजस्विनीचा या फोटोतील हटके अंदाज साऱ्यांना भावतो आहे. यात तिने कोणत्याही प्रकारचा मेकअप केलेला नाही.

तेजस्विनीचा असा लुक पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. तिच्या या फोटोंवर अनेक लाईक्स आणि कमेंटस मिळत आहेत. चाहते तेजस्विनीचा नॅचरल ब्युटीच्या प्रेमात पडत आहेत. जितकी ती ऑनस्क्रीन सुंदर दिसते तितकीच ती ऑफस्क्रीनही खूप सुंदर दिसत असल्याचे चाहते सांगत आहेत.

Web Title: All The Lovers Of ‘No-Makeup’ Make-up, Bookmark tejaswini pandit During Lockdown-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.