अलका कुबल यांचा मुलीसोबतचा फोटो होतोय ट्रेंड, जाणून घ्या यामागचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 11:01 AM2020-03-19T11:01:21+5:302020-03-19T11:10:15+5:30

इशानी लवकरच दिल्लीतील निशांत वालिया याच्यासोबत लग्न करणार आहे.

Alka kubal share her pic daughter eashanee on instagram gda | अलका कुबल यांचा मुलीसोबतचा फोटो होतोय ट्रेंड, जाणून घ्या यामागचे कारण

अलका कुबल यांचा मुलीसोबतचा फोटो होतोय ट्रेंड, जाणून घ्या यामागचे कारण

googlenewsNext

मराठी इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांचा 'माहेरची साडी' सुपरहिट झाला. या सिनेमाला  अभूतपूर्व यश मिळाले. तसेच यासिनेमामुळे अलका कुबल यशाच्या शिखरावर पोहोचल्या त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. सोशल मीडियावर देखील त्या सक्रिय असतात. नुकताच त्यांनी आपल्या लेकीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत त्यांच्यासोबत त्यांची मोठी मुलगी इशानी दिसतेय. दोघांनी सारख्या रंगाचे ड्रेस घातले आहेत.  


अलका कुबल यांचे पती समीर आठल्ये हे फिल्म इंडस्ट्रीतील एक दिग्गज सिनेमेटोग्राफर म्हणून ओळखले जातात. अलका व समीर यांनी प्रेमविवाह केला. अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये यांना इशानी आणि कस्तुरी या दोन लेकी आहेत. या पैकी त्यांची थोरली लेक इशानी लवकरच दिल्लीतील निशांत वालिया याच्यासोबत लग्न करणार आहे. अद्याप फक्त रोका सेरेमनी झाली, लग्नाची तारिख समोर आली नसून लवकरच हे दोघे लग्नगाठ बांधणार असे दिसतंय.


इशानीला २०१५ मध्ये वैमानिकाचं ‘लाइफटाइम लायसन्स’ मिळालं असून ती सध्या मियामी ,फ्लोरिडा येथे वास्तव्यास आहे. विशेष म्हणजे इशानी ज्या निशांतसोबत लग्नगाठ बांधणार आहे. तो मुळचा दिल्लीचा असून तोदेखील मियामीमध्येच राहतो. मुळात इशानीला लहानपणापासूनच वैमानिक व्हायचे स्वप्न होते. ती आपल्या ध्येयावर ठाम होती. जिद्द आणि मेहनतीमुळे तिने आपल्या करिअरचा वेगळा मार्ग निवडत काहीतरी वेगळे काम करत स्वतःला सिद्ध केले.

Web Title: Alka kubal share her pic daughter eashanee on instagram gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.