पुन्हा अनिकेत-प्रियदर्शन झळकणार एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 04:51 PM2018-10-29T16:51:50+5:302018-10-29T16:54:03+5:30

‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मधील २०१८ चे पहिले धम्माल गाण ‘तू हात नको लाऊ’ मुंबई मध्ये धूमधडाक्यात प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणं स्वरबद्ध केले आहे स्वाती शर्मा आणि नकाश अजीज यांनी, संगीत राजु सरदार यांचे आहे.

Again, Aniket Vishwasrao And Priyadarshan Jadhav will be seen together In Majha Baykocha Priyakar | पुन्हा अनिकेत-प्रियदर्शन झळकणार एकत्र

पुन्हा अनिकेत-प्रियदर्शन झळकणार एकत्र

googlenewsNext

विश्वासराव आणि प्रियदर्शन जाधव पुन्हा एकत्र रुपेरी झळकणार आहेत. या दोघांची जोडगोळी 'माझ्या बायकोचा प्रियकर' या सिनेमात धमाल करण्यास सज्ज झाली आहे. 'माझ्या बायकोचा प्रियकर' या सिनेमाच्या माध्यमातून हे दोघे पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. हिंदी व मराठी अशा दोन्ही सिनेसृष्टीमध्ये अनेक अभिनेत्यांच्या जोड्या हिट ठरल्या आहेत. अनिकेत-प्रियदर्शन अशी नवीन जोडगोळी मराठी सिनेसृष्टीला मिळाली आहे. 

या सिनेमाचे दिग्दर्शन राजीव एस. रुईया यांनी केले आहे. अनिकेत-प्रियदर्शनसोबतच या सिनेमात भाग्यश्री मोटे, प्रिया गमरे, अंशुमन विचारे, भारत गणेशपुरे, पदम सिंग, सुरेश पिल्लई, स्वाती पानसरे, अनुपम ताकमोघे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. राजकला मुव्हीज अँड बाबा मोशन पिक्चर्स प्रा. लि.या बॅनरखाली निर्मिती करण्यात आलेला हा सिनेमा २३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. दीपक रुईया, राजेंद्र गोयंका, प्रदीप के शर्मा, अनिता शर्मा, धवल जयंतीलाल गाडा, अक्षय जंयतीलाल गाडा हे निर्माते आहेत. तर रेश्मा कडाकिया, कौशल कांतीलाल गाडा, निरज गाडा हे सहनिर्माते आहेत. 


‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मधील २०१८ चे पहिले धम्माल गाण ‘तू हात नको लाऊ’ मुंबई मध्ये धूमधडाक्यात प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणं स्वरबद्ध केले आहे स्वाती शर्मा आणि नकाश अजीज यांनी, संगीत राजु सरदार यांचे आहे. नुकतेच झी म्युझिकने हे गाणे प्रदर्शित केले व ह्या गाण्याला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. हे गाणे मीरा जोशी व मराठी इंडस्ट्रीतील सुपरस्टार प्रियदर्शन जाधववर चित्रित करण्यात आले आहे. या दोघांची धमाल केमिस्ट्री आणि मीराच्या मनमोहक अदा यामुळे हे गाणे अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे.

सिनेमात मुख्य कलाकार प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव सोबत भाग्यश्री मोटे, अंशुमन विचारे, भारत गणेशपुरे, प्रिया गमरे, पदम सिंग, सुरेश पिल्लाई, अनुपमा ताकमोघे, स्वाती पानसरे अशी तगडी स्टारकास्ट सिनेमात आहे.

Web Title: Again, Aniket Vishwasrao And Priyadarshan Jadhav will be seen together In Majha Baykocha Priyakar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.