हिंदी व मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयानं सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. वेगवेगळ्या अंदाजातील फोटो ही ती अपलोड करत असून रसिकांची प्रशंसा मिळवताना दिसते. राझी व सत्यमेव जयते या हिंदी चित्रपटात काम केल्यानंतर आता अमृता आणखीन एका हिंदी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला अमृताने सुरूवात केली आहे.

अमृता खानविलकरने राझी चित्रपटातील भूमिकेनं रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. त्यानंतर आता अमृता मलंग या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला नुकतीच सुरूवात झाली आहे. 


अमृता खानविलकरचा अभिनय आणि नृत्य यावर रसिक तितकेच फिदा आहेत.  मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. पती हिमांशूसह तिने डान्स रियालिटी शो ‘नच बलिये’चे विजेतेपदसुद्धा पटकावलं होतं. तसेच अमृता ‘खतरों के खिलाडी 10'मध्ये दिसणार आहे.  


लवकरच अमृता पॉन्डेचेरी या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. सचिन कुंडलकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.

कुंडलकर आणि तेजस मोडकने या सिनेमाची कथा लिहली आहे. या सिनेमाची कथा नेमकी काय हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र सिनेमाची तगडी स्टारकास्ट रसिकांना आकर्षित करेल.

कारण यात अमृता खानविलकरसह सई ताम्हणकर आणि वैभव तत्तववादी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

English summary :
Amruta Khanvilkar will be seen in the Hindi movie Malang. She will be seen in the lead role. The shooting for this movie has just started.


Web Title: After 'Razi', 'Satyamev Jayate', Amruta Khanvilkar will once again be seen in Bollywood, now she is busy shooting.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.