पहिलाच सिनेमा 'सैराट' हिट झाल्यानंतर रिंकू राजगुरु झाली सिलेक्टीव्ह, या कारणांमुळे दिला अनेक सिनेमांना नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 08:00 AM2021-08-17T08:00:00+5:302021-08-17T08:00:00+5:30

सैराटमध्ये लक्षवेधी ठरली ती परशा आणि आर्चीची जोडी. सैराटमध्ये आर्ची साकारणारी रिंकू राजगुरु तर भलतीच भाव खाऊन गेली. तिचा प्रत्येक डायलॉग,तिचं ट्रॅक्टर किंवा बुलेट चालवणं, परशावरील प्रेम असा प्रत्येक अंदाज रसिकांना भावला.

After the first movie 'Sairat' became a hit, Rinku Rajguru became selective, Know The Reason | पहिलाच सिनेमा 'सैराट' हिट झाल्यानंतर रिंकू राजगुरु झाली सिलेक्टीव्ह, या कारणांमुळे दिला अनेक सिनेमांना नकार

पहिलाच सिनेमा 'सैराट' हिट झाल्यानंतर रिंकू राजगुरु झाली सिलेक्टीव्ह, या कारणांमुळे दिला अनेक सिनेमांना नकार

googlenewsNext

मराठीतील सुपरडुपर हिट सिनेमा म्हणजे सैराट. झिंग झिंग झिंगाटच्या तालावर या सिनेमानं रसिकांना अक्षरक्षा याड लावलं. सिनेमाच्या कथेपासून सगळ्याच गोष्टी खास होत्या. त्यामुळे तिकीट खिडकीवरही सैराटने सगळे रेकॉर्ड मोडले. सैराट सिनेमाची कथा, कलाकारांचा दमदार अभिनय, आकर्षक असं चित्रीकरण, नागराज मंजुळेचे अफलातून दिग्दर्शन अशा अनेक गोष्टींमुळे सैराटची जादू आजही तसूभरही कमी झालेली नाही. 

सैराटमध्ये लक्षवेधी ठरली ती परशा आणि आर्चीची जोडी. सैराटमध्ये आर्ची साकारणारी रिंकू राजगुरु तर भलतीच भाव खाऊन गेली. तिचा प्रत्येक डायलॉग,तिचं ट्रॅक्टर किंवा बुलेट चालवणं, परशावरील प्रेम असा प्रत्येक अंदाज रसिकांना भावला. त्यामुळेच सैराटमधील आर्ची अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनली. सैराटमुळे तरुणाई जणू काही आर्ची नावाचा जप करु लागली. या सिनेमाने आर्ची अर्थात रिंकू राजगुरुचं संपूर्ण आयुष्यच पालटलं. 


“सैराट” या सिनेमानंतर रिंकूला अनेक सिनेमाच्या ऑफर्स आल्या पण त्या तिने त्या नाकारल्या. असे करण्यामागे सुद्धा तिचे एक कारण होते. आपल्या एका मुलाखतीमध्ये तिने हे कारण सविस्तरपणे सांगितले होते.ऑफर झालेल्या सिनेमांच्या ऑफर्स यांत काही नाविन्य जाणवले नाही. अनेकांना 'सैराट'सारखचा सिनेमा बनवायचा होता.

'सैराट' सिनेमातल्या भूमिकेसारखीच भूमिकेच्या ऑफर मिळायला लागल्या. मला सैराटसारखीच भूमिका करायची नव्हती. काही तरी हटके भूमिकांच्या शोधात मी होते. त्यामुळे जास्त विचार न करता आलेल्या ऑफर्स नाकारल्याचे तिने सांगितले होते.तसेच सैराट हा सिनेमा इतर अन्य भाषांमध्ये करण्यासाठी रिंकूला विचारण्यात आले होते. तेव्हाही रिंकूने स्पष्ट नकार दिल्याचे तिने सांगितले होते. 

रिंकू सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असते. आपले व्हिडीओ फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. रिंकूचा आता फुलऑन मेकओव्हर झाला आहे. 'सैराट' रिलीज होण्याआधीची रिंकू आणि आत्ताची रिंकू यांत बराच फरक पाहायला मिळेल.

 

गावरान अंदाजातील रिंकूचा जणू काही कायापालट झाल्याचे तुम्हाला तिच्या जुन्या आणि आताच्या फोटोवरुन सहज कळेल. एका गावातल्या मुलीने आर्ची साकारत तरुणाईवर जादू केली आहे. त्यामुळे तिची एक झलक पाहण्यासाठी तरुण-तरुणी उत्सुक असतात.

Web Title: After the first movie 'Sairat' became a hit, Rinku Rajguru became selective, Know The Reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.