​आदिनाथ कोठारे म्हणतोय टेक केअर गुड नाईट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 10:16 AM2017-10-16T10:16:36+5:302017-10-16T15:46:36+5:30

आदिनाथ कोठारेचा टेक केअर गुड नाईट या चित्रपटाची निवड मामी फेस्टिव्हलमध्ये झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरिश जोशी यांचे ...

Adinath Kothare says, Tech Care Good Night | ​आदिनाथ कोठारे म्हणतोय टेक केअर गुड नाईट

​आदिनाथ कोठारे म्हणतोय टेक केअर गुड नाईट

googlenewsNext
िनाथ कोठारेचा टेक केअर गुड नाईट या चित्रपटाची निवड मामी फेस्टिव्हलमध्ये झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरिश जोशी यांचे असून या चित्रपटाची निर्मिती महेश मांजरेकर आणि हिमांशू पाटील यांनी केली आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना एक वेगळा आदिनाथ पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे.
आदिनाथ कोठारेने छकुला या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून त्याच्या कारकिर्दिला सुरुवात केली. झपाटलेला २, सतरंगी रे, दुभंग यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने काम केले. तो 100 डेज या मालिकेतही काही महिन्यांपूर्वी झळकला होता. एक अभिनेता म्हणून त्याने मराठी चित्रपटसृष्टीत त्याचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. 
आदिनाथ केवळ एक चांगला अभिनेताच नाहीये तर एक निर्माता म्हणून देखील त्याने आपले नाव कमावले आहे. गणपती बाप्पा मोरया या मालिकेचा तो निर्माता असून ही मालिका प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. तसेच एक दिग्दर्शक म्हणून देखील लवकरच तो त्याच्या कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. तसेच विठू माऊली ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या कार्यक्रमाची निर्मिती कोठारे व्हिजन करणार आहे.
आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्यानंतर टेक केअर गुड नाईट या चित्रपटात प्रेक्षकांना आदिनाथचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे. या त्याच्या भूमिकेविषयी आदिनाथ सांगतो, मी माझ्या सगळ्याच भूमिका खूप चोखंदळपणे निवडतो. मी माझ्या भूमिकांच्या बाबतीत खूप चुझी आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. या चित्रपटातील व्यक्तिरेखेविषयी मी अधिक काहीही सांगू शकत नाही. पण आजवर मी साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका खूप वेगळी असल्याचे मी नक्कीच सांगेन. या चित्रपटात माझ्यासोबतच सचिन खेडेकर, इरावती हर्षे, पर्ण पेढे यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट गोवा फिल्म फेस्टिव्हमध्येही दाखवण्यात आला होता. त्यावेळी देखील मराठीतीलच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेकांनी मला फोन करून माझ्या भूमिकेचे कौतुक केले. 

Also Read : आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर-कोठारेचा हा व्हिडिओ झाला व्हायरल

Web Title: Adinath Kothare says, Tech Care Good Night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.