त्या शॉकने मी जिवंत झाले तर? आज्जी-आदिनाथचा संवाद ‘सॉलिड हिट’, तुम्हालाही आवरणार नाही हसू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 07:46 PM2021-05-11T19:46:05+5:302021-05-11T19:46:28+5:30

अभिनेता आदिनाथ कोठारेच्या दोन पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

Addinath Kothare post viral on social media | त्या शॉकने मी जिवंत झाले तर? आज्जी-आदिनाथचा संवाद ‘सॉलिड हिट’, तुम्हालाही आवरणार नाही हसू

त्या शॉकने मी जिवंत झाले तर? आज्जी-आदिनाथचा संवाद ‘सॉलिड हिट’, तुम्हालाही आवरणार नाही हसू

googlenewsNext
ठळक मुद्दे आदिनाथचे हे गमतीदार संवाद सोशल मीडियावर सध्या व्हायरल होऊ लागले आहेत. अनेकांनी यावर एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

लॉकडाऊनमध्ये तुमचा आमचा आवडता आदिनाथ अर्थात आदिनाथ कोठारे काय करतोय? तर नुसती मज्जा मस्ती. होय, त्याच्या सोशल मीडियाच्या मजेशीर पोस्ट वाचून तुम्हालाही याचा अंदाज येईल. कधी लेकीसोबतचा तर कधी आजीसोबतचा त्याचा संवाद आणि या संवादाच्या पोस्ट इतक्या भारी आहेत की, वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही.
सध्या त्याच्या दोन पोस्ट तुफान व्हायरल होत आहेत.

पहिल्या पोस्टमध्ये त्याने लेकीसोबतचा संवाद पोस्ट केला आहे. यात जिजासोबतचा एक सुंदर फोटो पोस्ट करत त्याने गमतीदार संवाद लिहिला आहे. जिजा व डॅडा दोघेही घरात आहेत. अशात जिजा- डॅडाचा संवाद रंगतो.
जिजा म्हणते, डॅडा आई कधी येणार.. 
डॅडा म्हणतो, येईल गं. मी आहे ना.. 
यावर जिजा काय उत्तर देत माहितीये?. म्हणूनच विचारतेय...असे ती म्हणते. 

दुस-या पोस्टमध्ये आदिनाथने आजीसोबतचा संवाद टाकला आहे.
आज्जी - आदिनाथ, मी गेले की माझी बॉडी त्या इलेक्ट्रिक ह्याचात नका टाकू हं. लाकडांवरच जाळून टाका.
आदी- का गं? इलेक्ट्रिक जास्तं सोप्पं आहे आता.

आज्जी - गप्प बस़ चुकून त्या इलेक्ट्रिक शॉकने मी जिवंत झाले तर? त्या मशीन मधून तुम्हाला माझ्या हाका पण ऐकू येणार नाहीत.
 आदिनाथचे हे गमतीदार संवाद सोशल मीडियावर सध्या व्हायरल होऊ लागले आहेत. हा आज्जीसोबतचा त्याचा हा संवाद तर सोशल मीडियावर सॉलिड हिट झाला आहे. अनेकांनी यावर एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

Web Title: Addinath Kothare post viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.