"चेहरा ठेवा हसरा कारण सण आहे दसरा..", सोनाली कुलकर्णीच्या पोस्टवर चाहत्याची कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 04:17 PM2022-10-05T16:17:45+5:302022-10-05T16:56:18+5:30

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Actress Sonalee kulkarni wish happpy dussehra to her fans | "चेहरा ठेवा हसरा कारण सण आहे दसरा..", सोनाली कुलकर्णीच्या पोस्टवर चाहत्याची कमेंट

"चेहरा ठेवा हसरा कारण सण आहे दसरा..", सोनाली कुलकर्णीच्या पोस्टवर चाहत्याची कमेंट

googlenewsNext

दसरा हा हिंदूंच्या महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे, कारण या दिवशी भगवान श्रीराम यांनी रावणाचा वध करून विजयोत्सव साजरा केला होता. समाजातील रावणासारख्या दुष्प्रवृत्तीचे दहन व्हावे म्हणून दरवर्षी या दिवशी रावण दहन करून आपण हा सण साजरा करतो. तसेच आपट्याचे पान देऊन आपापसातील मतभेद विसरून विचारांचे सोने लुटतो. मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आज त्याने दसऱ्यानिमित्त चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोनेरी साडी नेसून,
म्हणते “सोनं घ्या सोनं” चेहरा ठेवा हसरा कारण सण आहे दसरा, दसरा तुम्हा सर्वांना हसरा जावो….सोन्याच्या दिवसाच्या, तुम्हाला शुभेच्छा बरं का, या “सोना” कडणं अशी पोस्ट तिने शेअर केली आहे. विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा, सोन घ्या सोन्यासारखे रहा, चाहत्यांनी ही सोनालीला शुभेच्छा दिल्या आहेत. 

सोनाली कुलकर्णीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सध्या ती डान्स महाराष्ट्र डान्समध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसते आहे. तसेच लवकरच ती व्हिक्टोरिया या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत पुष्कर जोग मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ती मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती छत्रपती ताराराणी यांच्या भूमिकेत झळकणार आहे.

Web Title: Actress Sonalee kulkarni wish happpy dussehra to her fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.