अभिनेत्री संस्कृती बालगुडेच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, पाहा हे फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 06:51 PM2020-10-09T18:51:36+5:302020-10-09T19:01:01+5:30

तिचे सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे

actress Sanskriti balgude share saree photoshoot on instagram | अभिनेत्री संस्कृती बालगुडेच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, पाहा हे फोटोशूट

अभिनेत्री संस्कृती बालगुडेच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, पाहा हे फोटोशूट

googlenewsNext

आपल्या अभिनयाबरोबर आपल्या लूक्समुळे रसिकांची मनं जिंकलेली अभिनेत्री संस्कृती बालगुडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चर्चेत येण्यास कारणीभूत ठरले आहेत तिचं फोटोशूट. तिच्या या फोटोंमधील अदा कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत. सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारणारी संस्कृती सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. मात्र यावेळी तिने साडीतले फोटोशूट करुन सगळ्यांनाचे लक्ष वेधून घेतले आहे. बेबी पिंक रंगाच्या साडीत संस्कृती खूपच सुंदर दिसतेय. याती वेगवेगळ्या पोज देताना दिसतेय. फॅन्सना तिचे हे फोटोशूट खूप आवडले आहे. 

 तिचे सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. 'सांगतो ऐका' या सिनेमानंतर निवडुंग, शिव्या, एफयु असे संस्कृतीचे विविध सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले आहेत. आगामी काळात भारंभार सिनेमा स्वीकारायचे नसून सिलेक्टिव्ह राहण्याचा संस्कृतीने निर्धार केला आहे.

'सांगतो ऐका' या सिनेमानंतर निवडुंग, शिव्या, एफयु असे संस्कृती बालगुडेचे विविध सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले आहेत. संस्कृती शेवटची 'सर्व लाइन व्यस्त आहेत' या चित्रपटात दिसली होती.या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

Web Title: actress Sanskriti balgude share saree photoshoot on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.