मराठी कलाकार अभिनयासह इतर अनेक गोष्टींमध्ये हुशार आणि पारंगत असतात. अभिनयाच्या कौशल्यासह आपल्या अंगभूत कलांनी विविध कलाकार आपलं वेगळेपण जपतात. काही कलाकार फिटनेस फ्रिक असतात. फिटनेस फ्रिक अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळीचेही नाव मोडले जात आहे.  सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. 

आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. अभिनय क्षेत्रात यशस्वी ठरलेली प्राजक्ता माळी तिच्या खासगी आयुष्यात फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता.ती योगासनं करताना दिसतेय. या फोटोला तिने समर्पक अशी कॅप्शनही दिली होती. तिच्या या फोटोवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही.

 प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगणा असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे. यासह प्राजक्ताला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे. 


Web Title: Actress Prajkata Mali Workout Session Wows The Internet. Watch Video Here
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.