अजून काय हवं! आयुष्य सार्थकी लागलं! लता दीदींच्या कौतुकानं भारावून गेला सुबोध भावे

By गीतांजली | Published: October 9, 2020 05:05 PM2020-10-09T17:05:44+5:302020-10-09T17:06:18+5:30

अभिनेता सुबोध भावे सध्या त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आला आहे.

Actor subodh bhave got emotional by lata didi's appreciation | अजून काय हवं! आयुष्य सार्थकी लागलं! लता दीदींच्या कौतुकानं भारावून गेला सुबोध भावे

अजून काय हवं! आयुष्य सार्थकी लागलं! लता दीदींच्या कौतुकानं भारावून गेला सुबोध भावे

googlenewsNext

अभिनेता सुबोध भावे सध्या त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आला आहे. सुबोधने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आयुष्य सार्थकी लागले असं म्हटलं आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी सुबोध भावेचे कौतूक केले आहे. लता दीदींनी सुबोधचे बालगंधर्व सिनेमा पाहिल्यानंतर सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत त्याचे कौतुक केले आहे.  

काय लिहिले लता दीदींनी ?
नमस्कार, आज पहिल्यांदा मी नाट्य संगीतातील महान कलाकार बालगंधर्व यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा पाहिला. माझी बालगंधर्वजींशी तीन वेळा भेट झाली होती. प्रत्येकवेळी ते मला प्रेमाने आणि आपुलकीने भेटून आर्शीवाद द्यायचे. मी माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी त्यांना शिवाजी पार्कला बोलवलं होते. तिथं येऊन त्यांनी दोन भजनं गायली होती. हा सिनेमा पाहताना त्या सर्व आठवणी ताज्या झाल्या. त्यांच्या आयुष्यातील ज्या गोष्टी मला माहिती नव्हत्या त्या हा सिनेमा पाहिल्यावर कळल्या. हा सिनेमा खूप छान झाला आहे. यात बालगंधर्व यांची भूमिका साकारणार अभिनेता सुबोध भावे आणि त्याच्यासाठी पाश्वगायन केलेले गायक आनंद भाटे तसेच इतर सगळ्या कलाकरांचे अभिनंदन करते. एक फोटो तुम्हा सर्वांसाठी ज्यात वसंत देसाई, मी बालगंधर्वजी, बेगम अख्तरजी आणि मोगुबाई कुर्डीकरजी आहेत. 

सुबोध भावेने लता दीदींनी लिहिली पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहेत. ही पोस्ट शेअर करताना सुबोध लिहितो,साक्षात सरस्वतीदेवीकडून कौतुक!अजून काय हवं! आयुष्य सार्थकी लागलं! लतादीदी तुम्हाला साष्टांग नमस्कार.    

Web Title: Actor subodh bhave got emotional by lata didi's appreciation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.