धडाकेबाज लूकमध्ये दिसणार अभिनेता ललित प्रभाकर, 'टर्री'चं मोशन पोस्टर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 02:56 PM2020-12-25T14:56:02+5:302020-12-25T15:05:17+5:30

अभिनेता ललित प्रभाकरने रंगभूमी, छोटा पडदा आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

Actor lalit Pprabhakar will be seen in marathi movie tarri | धडाकेबाज लूकमध्ये दिसणार अभिनेता ललित प्रभाकर, 'टर्री'चं मोशन पोस्टर आऊट

धडाकेबाज लूकमध्ये दिसणार अभिनेता ललित प्रभाकर, 'टर्री'चं मोशन पोस्टर आऊट

googlenewsNext

अभिनेता ललित प्रभाकरने रंगभूमी, छोटा पडदा आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका तसंच 'चि. व चि.सौ.कां' या सिनेमातील त्याच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या आहेत. ललित सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. ललितने त्याचा आगामी सिनेमा ‘टर्री'चे मोशन पोस्टर शेअर केलं आहे. या सिनेमात ललित मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे.  

'टर्री'च्या मोशन पोस्टरच्या सुरुवातीला तरुणाईला भुरळ घालणाऱ्या लाऊड म्युझिकसह हायलाईट झालेली नावं समोर येतात, हिंदीतील किंवा हॉलीवूड मधल्या एखाद्या सिनेमाप्रमाणं ती एका मागोमाग एक पुढे सरकतात, त्यानंतर विजेच्या वेगानं धावू पाहणाऱ्या तरुणाईचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या एखाद्या स्पोर्टस बाईकचा आवाज आणि लाऊड म्युझिकसह नायकाचं नाव झळकतं, अखेरीस मोटरसायकल, हॅार्न आणि संगीताचा मेळ साधत येतं सिनेमाचं टायटल.... ‘टर्री'

 शीर्षकापासून सादरीकरणापर्यंत सर्वच पातळीवर हा सिनेमा नाविन्याची जाणीव करून देणारा आहे. सिनेमाचं टायटल 'टर्री' म्हणजे नेमकं काय? हा मोशन पोस्टर पाहिल्यावर पडणारा पहिला प्रश्न... इथपासूनच सिनेमा खऱ्या अर्थानं विचार करायला लावणारा ठरतो. 'टर्री' म्हणजे काय तर बेधडक. जबरदस्त ऊर्जा असलेला, सळसळत्या रक्ताचा तरुण, जो बेफिकीर, बेधडक आहे.  महेश रावसाहेब काळे यांनी आपल्या काहीशा रांगड्या शैलीत या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. पुढील वर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याची निर्मिती संस्थेची योजना आहे.

Web Title: Actor lalit Pprabhakar will be seen in marathi movie tarri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.