Actor Jitendra joshi like this thing, know what it is? | अभिनेता जितेंद्र जोशीला आवडते ही गोष्ट?, जाणून घ्या......
अभिनेता जितेंद्र जोशीला आवडते ही गोष्ट?, जाणून घ्या......

चित्रपट, छोटा पडदा आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयाने अभिनेता जितेंद्र जोशीने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. दमदार अभिनेता अशी त्याची ओळख निर्माण झाली आहे. दुनियादारीमधील साई असो किंवा मग तुकाराम चित्रपटातील संत तुकारामांची आव्हानात्मक भूमिका, प्रत्येक भूमिकेला जितेंद्र जोशी तितक्याच सहजसुंदर अभिनयाने न्याय देतो.जितेंद्र अभिनयासह सोशल मीडियावरही बराच सक्रीय असतो. या माध्यमातून तो आपले मित्र आणि चाहत्यांसोबत संवाद साधतो.

 

शिवाय स्वतःचे फोटो, आवडीनिवडी याबाबतही गुपित शेअर करतो. नुकतंच त्याने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यांत सूर्योदय होत असल्याचे पाहायला मिळत आहे. उगवणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे पिवळंधमक झाले आकाश, हळूच डोंगराआडून वर डोकावणारा सूर्य दिसत आहे. सोबतच सूर्योदयानंतर पक्ष्यांचे थवेही पाहायला मिळतायत. या फोटोला जितेंद्रने कॅप्शन दिली आहे. ‘मला अगदी सकाळी सकाळी नियोजित शूट आवडतात, कधीतरी…’असं कॅप्शन त्याने या फोटोंना दिली आहे. 

Web Title: Actor Jitendra joshi like this thing, know what it is?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.