अभिनेता गोविंदाने उभारली एन.डी.स्टुडीयोची भव्य 'गुढी'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2018 04:26 AM2018-03-19T04:26:49+5:302018-03-19T09:56:49+5:30

नितीन चंद्रकांत देसाई यांच्या संकल्पनेतून कर्जत येथील एन.डी.स्टुडियोत उदयास आलेल्या बॉलिवूड थीमपार्कमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर,बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या हस्ते मराठी नववर्षाचे ...

Actor Govinda launches ND Artudio's grand 'Gudi' | अभिनेता गोविंदाने उभारली एन.डी.स्टुडीयोची भव्य 'गुढी'

अभिनेता गोविंदाने उभारली एन.डी.स्टुडीयोची भव्य 'गुढी'

googlenewsNext
तीन चंद्रकांत देसाई यांच्या संकल्पनेतून कर्जत येथील एन.डी.स्टुडियोत उदयास आलेल्या बॉलिवूड थीमपार्कमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर,बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या हस्ते मराठी नववर्षाचे भव्य स्वागत करण्यात आले. भारतीय चित्रपटसृष्टीच्या शृंगाराने सजलेल्या या बॉलिवूड थीमपार्कात दि.१७ आणि १८ मार्च दरम्यान पार पडलेल्या या सोहळ्यात गोविंदाच्या हस्ते भारतातील सर्वात मोठी ५१ फुट लांबीची गुढी उभारण्यात आली. मराठी नववर्षाच्या दिमाखदार सुरुवातीसाठी बॉलीवूड थीमपार्कात भव्य शोभायात्रादेखील काढण्यात आली.भारतीय नियतकालिकेनुसार 'चैत्र पाडवा' म्हणून संबोधल्या जाणा-या या नववर्षाच्या स्वागतासाठी बॉलीवूड थीमपार्कात आलेल्या प्रत्येक माणसाचा एन. डी.स्टुडीयोत खास पारंपारिकपद्धतीने पाहुणचार करण्यात आला. सामान्य प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आलेल्या या थीमपार्कमध्ये केवळ हिंदीच नव्हे तर अखंड भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास पाहायला मिळतो.कृष्णधवल ते रंगीत अशी भारतीय चित्रपटसृष्टीच्या दीर्घ प्रवासाची सफर यात घडत असून, फिल्मी परेडचा रोमांचित करणारा अनुभव प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरत आहे. मोठ्या पडद्यावर दिसणारे भव्य राजवाडे आणि गड किल्ल्यांचे सेट्स येथे उभारण्यात आले असून, सिनेरासिकांसाठी हे सर्व सेट्स कुतूहलाचा विषय ठरत आहे. अनेक सुप्रसिद्ध सिनेमांचे चित्रीकरण झालेल्या या वास्तूत प्रेक्षकांना चक्क वावरतादेखील येत आहे. या महाफिल्मोत्सवामध्ये सिनेमातील स्टंट, नाचगाणी तसेच अॅक्शनपटात सिनेरसिकाना स्वतः सहभाग घेता येत असल्यामुळे, सिनेचाहत्यांसाठी एन.डी. स्टुडीयोतील हे बॉलीवूड थीमपार्क पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे,हे नक्की !  



नितीन चंद्रकांत देसाई यांच्या संकल्पनेतून एन. डी. स्टुडीयोत साकार झालेल्या बॉलिवूडचा नजराणा 'याची देहि याची डोळा' पाहण्याचा रंजक अनुभव महिलांनी यावेळी घेतला. एन.डी. फिल्म वर्ल्डच्या अंतर्गत, एन.डी. स्टुडियोच्या भव्यदिव्य आवारात उभारण्यात आले आहे.कृष्णधवल ते रंगीत अशी भारतीय चित्रपटसृष्टीच्या दीर्घ प्रवासाची  सफर यात घडून येणार असून फिल्मी परेडचा रोमांचदेखील प्रेक्षकांना अनुभवता येईल.या महाफिल्मोत्सवामध्ये सिनेमातील स्टंट, नाचगाणी तसेच अॅक्शनपटात सिनेरसिकाना स्वतः सहभाग घेता येणार आहे.सिनेमातील पात्रांचा पेहराव आणि मेक-अप करण्याची संधी यात असून,आपल्या आवडत्या सिनेमात प्रेक्षक म्हणून नव्हे तर एक कलाकार म्हणून वावरण्याची मुभा यात प्रेक्षकांना देण्यात आली आहे.तसेच या फिल्मोत्सवात उदयोन्मुख कलाकारांसाठी मुक्त व्यासपीठ उभारले जाणार असून याची दखल बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडून घेतली जाणार आहे.

Web Title: Actor Govinda launches ND Artudio's grand 'Gudi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.