ठळक मुद्देपगरी पगडी हा खूपच जुना चित्रपट असून यात कामिनी कौशल, शशिकला, वस्ती, गोपे अशा कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यानंतर याच कथेवर आधारित असलेला दिल दौलत दुनिया हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.

काही वर्षांपूर्वी आयत्या घरात घरोबा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला आज इतकी वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. या चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, राजेश्वरी सचदेव यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट त्या काळी प्रचंड गाजला होता. या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांच्या भूमिका प्रेक्षकांना भावल्या होत्या. 

आयत्या घरात घरोबा या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळाले होते की, अतिशय श्रीमंत कुटुंब एका मोठ्या बंगल्यात राहात असते. पण वर्षातील काही महिने ते भारताबाहेर फिरायला जात असते. त्या वेळात एक व्यक्ती त्यांच्या घरात येऊन मस्त राहात असतो. पण तो त्या घरातील कोणतीही वस्तू खराब करत नाही की कोणती वस्तू चोरत देखील नाही. ही व्यक्ती त्या घरात राहात असल्याचे या घरातील मंडळींना कळल्यानंतर ते चक्क नोकर बनून त्या घरात जातात. या चित्रपटाची ही धमाल कथा प्रेक्षकांना भावली होती. तसेच या चित्रपटातील गाणी देखील प्रचंड हिट झाली होती. 

आयत्या घरात घरोबा हा तुमचा आवडता चित्रपट ओरिजनल नसून कोणत्यातरी चित्रपटाचा रिमेक आहे असे तुम्हाला कोणी सांगितले तर ते तुम्हाला खरे वाटेल का... हो, हे खरे आहे आयत्या घरात घरोबा हा चित्रपट पगरी पगडी या चित्रपटावर बेतलेला आहे. पगरी पगडी हा खूपच जुना चित्रपट असून यात कामिनी कौशल, शशिकला, वस्ती, गोपे अशा कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यानंतर याच कथेवर आधारित असलेला दिल दौलत दुनिया हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटात राजेश खन्ना, साधना, अशोक कुमार, ओम प्रकाश, सुलोचना, हेलन, जगदीप असे सगळेच दिग्गज कलाकार होते. हा चित्रपट पगरी पगडीचाच रिमेक होता. या दोन चित्रपटानंतर काहीशी तशीच कथा असलेला आयत्या घरात घरोबा हा चित्रपट प्रदर्शित झाला.

आयत्या घरात घरोबा या चित्रपटाचे निर्माते सचिन पिळगांवकर असून त्यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले होते. 


Web Title: Aayatya Gharat Gharoba is a remake of pugree pagdi movie and dil daulat duniya movie
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.