रुपेरी पडद्यावर झळकण्यास यश सज्ज; '3Idiots'च्या चतुरसोबत करणार चित्रपटात काम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 12:53 PM2022-04-08T12:53:49+5:302022-04-08T12:54:42+5:30

Aai kuthe kay karte: 'आई कुठे काय करते' या मालिकेत यशची भूमिका अभिषेक देशमुखने साकारली असून लवकरच तो एका नव्या कोऱ्या चित्रपटात झळकणार आहे.

aai kuthe kay karte fame yash aka abhishek deshmukh working with 3 idiots fame chatur in upcoming marathi movie | रुपेरी पडद्यावर झळकण्यास यश सज्ज; '3Idiots'च्या चतुरसोबत करणार चित्रपटात काम

रुपेरी पडद्यावर झळकण्यास यश सज्ज; '3Idiots'च्या चतुरसोबत करणार चित्रपटात काम

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay kartye) ही मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत प्रथम स्थानावर आहे. उत्तम कथानक आणि त्याला साजेशा कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका पहिल्या दिवसापासून लोकप्रिय झाली. यात खासकरुन अरुंधतीचा लाडका लेक यश हा विशेष लोकप्रिय झाला. सतत आईचा विचार करणारा, तिची काळजी घेणारा यश एक आदर्श मुलाचं उदाहरण म्हणून प्रेक्षकांसमोर आला. त्यामुळे त्याच्यावर प्रेम करणारा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. यामध्येच आता यशच्या म्हणजेच अभिनेता अभिषेक देशमुखच्या (abhishek deshmukh) चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. 

'आई कुठे काय करते' या मालिकेत यशची भूमिका अभिषेक देशमुखने साकारली असून लवकरच तो एका नव्या कोऱ्या चित्रपटात झळकणार आहे. अभिषेकने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याविषयीची माहिती चाहत्यांना दिली आहे. 

यशची Reel आणि Real आई एकाच फ्रेममध्ये; तुम्ही पाहिलं का त्याच्या खऱ्या आईला

अलिकडेच अभिषेकने एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये त्याच्यासोबत थ्री इडियट्स फेम सायलेन्सर' अर्थात अभिनेता ओमी वैद्य (omi vidya) दिसून येत आहे. या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन ओमी वैद्य करत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात मराठी कलाविश्वातील दिग्गज कलाकार  झळकणार आहेत.

दरम्यान, या चित्रपटाचं नाव आणि यात अभिषेक साकारत असलेल्या भूमिकेवर अद्यापही पडदा आहे. मात्र, लवकरच या चित्रपटाचे अपडेट्सही समोर येतील. या चित्रपटात अभिषेकसह ओमी वैद्य,विद्याधर जोशी, ईला भाटे ही कलाकार मंडळी स्क्रीन शेअर करणार आहेत.
 

Web Title: aai kuthe kay karte fame yash aka abhishek deshmukh working with 3 idiots fame chatur in upcoming marathi movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.