१ रुपया भी बडी चीज होती है बाबू..!, फक्त १ रुपयात लक्ष्मीकांत बेर्डेंनी केले होते चित्रपटात काम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 08:00 AM2021-05-30T08:00:00+5:302021-05-30T08:00:00+5:30

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी चक्क एक रुपयात केले होते एका चित्रपटात काम, वाचा हा किस्सा

1 rupee is also a big thing Babu ..!, Only 1 rupee Laxmikant Berden did the work in the film | १ रुपया भी बडी चीज होती है बाबू..!, फक्त १ रुपयात लक्ष्मीकांत बेर्डेंनी केले होते चित्रपटात काम

१ रुपया भी बडी चीज होती है बाबू..!, फक्त १ रुपयात लक्ष्मीकांत बेर्डेंनी केले होते चित्रपटात काम

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते महेश कोठारेमहेश कोठारे आणि दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी एकेकाळी खूप लोकप्रिय होती. आजही या दोघांचे चित्रपट प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवत आहेत. महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एक किस्सा फार कमी लोकांना माहित आहे. हा किस्सा म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी महेश कोठारे यांच्याकडून त्याच्या एका चित्रपटासाठी फक्त एक रुपये मानधन घेतले होते.

दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते महेश कोठारेंना हिंदी चित्रपट प्यार किये जाचा मराठीत रिमेक बनवायचा होता. सर्व कॅरेक्टर्ससाठी कलाकारांची निवड झाली होती. मात्र मेहमूद सारख्या हरहुन्नरी कलाकारासाठी त्यांना कलाकारच मिळेना. त्यावेळी महेश कोठारेंच्या आई आणि वडिलांचं नाटक सुरु होते. झोपी गेलेला जागा झाला या नाटकाचे हजारो प्रयोग झाले होते. नाटकातील कलाकार बबन प्रभुणे यांचे निधन झाले आणि त्यांच्या जागी नाटकात लक्ष्मीकांत बेर्डे काम करत होते.


महेश कोठारेंनी जेव्हा हे नाटक पाहिले तेव्हा त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांचे काम खूप आवडले आणि त्यांनी मेहमूदच्या भूमिकेसाठी लक्ष्मीकांत बेर्डे यांची निवड केली. महेश कोठारेंचा दिग्दर्शन असलेला हा पहिलाच चित्रपट होता त्यामुळे त्यांच्याकडे फारसे पैसेही नव्हते. त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी या चित्रपटा संदर्भात चर्चा केली आणि चित्रपटासाठी त्यांचा होकार मिळवला. महेश कोठारेंनी लगेच खिशातून एक रुपया काढला आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना दिला. होय त्या फक्त एका रुपयातच त्यांनी हा चित्रपट केला त्या चित्रपटाचे नाव होते धुमधडाका. या चित्रपटामधून लक्ष्मीकांत बेर्डे यांनाही मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. त्यानंतरच्या त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काम केले आहे.


महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी झपाटलेला, माझा छकुला, धांगडधिंगा, पछाडलेला असे एकापेक्षा एक दमदार चित्रपटात एकत्र काम केले आहे.

Web Title: 1 rupee is also a big thing Babu ..!, Only 1 rupee Laxmikant Berden did the work in the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.