प्रलयाचे धोके आणि मानवी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 06:00 AM2019-12-22T06:00:00+5:302019-12-22T06:00:03+5:30

वसाहतवादाच्या काळामध्ये संपूर्ण जगात  समुद्रकिनार्‍यावर असंख्य बंदरे आणि  त्यांच्या साथीने शहरे उभी राहिली.  कोट्यवधी माणसे या शहरांच्या आधारे  जगत आहेत आणि शहरांनाही जगवत आहेत.  आधुनिक मानवी संस्कृती या शहरांनी घडवली आहे.  मात्र समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून  ही शहरे पाण्यात जाण्याचा धोकाही मोठा आहे.  ही शहरे प्रलयापासून सुरक्षित ठेवण्यासाठी  देशोदेशीचे वैज्ञानिक आणि तंत्नज्ञ  आज भगीरथ प्रयत्न करीत आहेत.

The dangers of the deluge and the human endeavor | प्रलयाचे धोके आणि मानवी प्रयत्न

प्रलयाचे धोके आणि मानवी प्रयत्न

Next
ठळक मुद्देसिटीज ऑफ टुमॉरो- सुकर भविष्यासाठी आजच ‘तयार’ होत असलेल्या जगभरातील शहरांमधल्या प्रयोगांची कहाणी

- सुलक्षणा महाजन

पृथ्वीचे वाढते तापमान, पर्यावरण आणि हवामानातील बदल आता पृथ्वीवरच्या सर्व मानवी वस्त्यांना भेडसावणारी समस्या झाली आहे. त्यामुळे आर्टिक समुद्रावरचा बर्फ वितळून समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याचे भाकीत शास्रज्ञांनी केले आहे. आज जगातील बहुसंख्य मानवी वस्त्या, म्हणजेच महानगरे, शहरे समुद्रकाठावर वसलेली आहेत. म्हणूनच त्यांना असलेला समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून शहराचे अनेक भाग आणि पायाभूत सेवा पाण्यात जाण्याचा धोकाही मोठा आहे. 
ऐतिहासिक काळात अशा प्रलयामध्ये शहरे नष्ट झाल्याची अनेक उदाहरणे जगभर आहेत. त्यांना त्याकाळात अशा दूरच्या, हवामानांशी निगडित असलेल्या संकटाची चाहूल विज्ञानाच्या दूरदृष्टीअभावी लाभलेली नव्हती. आज मात्न नजीकच्या भविष्यातील प्रलयाची माहिती आणि त्याची तीव्रता समजल्यामुळे त्यावरचे उपाय शोधण्याची सुरु वात झाली आहे. त्यामुळेच गेल्या तीन-चार शतकांमध्ये भरभराटीला आलेली असंख्य शहरे प्रलयापासून सुरक्षित ठेवण्यासाठी देशोदेशीचे वैज्ञानिक आणि तंत्नज्ञ आज भगीरथ प्रयत्न करीत आहेत.
समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे भरतीच्या काळात शहरात घुसणारे समुद्राचे पाणी अनेक भागांचे नुकसान करून जीवन उद्ध्वस्त करते. काही वेळेला प्राणहानीही होते. युरोपमधील नॉर्थ समुद्रावर वसलेल्या नेदरलॅण्ड या देशाची जमीन तर समुद्रसपाटीच्या सरासरी एक मीटर खाली आहे. तेथील रॉटरडॅम ह्या बंदराच्या शहरातील काही जमिनीचे विभाग तर 7 मीटर समुद्रसपाटीखाली आहेत. जहाजांसाठी बांधलेले बंदराचे धक्के खाडीकिनारी आहेत. 22 मीटर उंचीचे आणि 200 मीटर लांबीच्या दोन प्रचंड झडपा खाडीचे तोंड बंधार्‍याप्रमाणे बंद करतात. उन्हाळ्यामध्ये जेव्हा मोठे उधाण येते तेव्हा समुद्राचे पाणी खाडीच्या तोंडावर अडविण्यासाठी हे सरकते बंधारे तयार केले आहेत. ओहोटी काळात हे बंधारे किनार्‍याला समांतर उभे केलेले असतात आणि भरतीच्या वेळी ते खाडीचे तोंड बंद करून भरतीच्या पाण्यापासून शहराचे रक्षण करतात. 1991 सालापासून नियोजन करून त्यांची उभारणी करण्यात आली आहे. 
2007 साली नोव्हेंबर महिन्यात आलेल्या वादळी लाटा त्यांनी यशस्वीपणे थोपविल्या आणि ते परीक्षेत उत्तीर्ण झाले. 1976पासून दरवर्षी पुराच्या तडाख्यात सापडणारे नेदरलंड पहिल्यांदाच पूरमुक्तीचा अनुभव घेऊ शकले. डच लोकांइतका समुद्राचा स्वभाव जाणणारा दुसरा देश जगाच्या पाठीवर सापडणार नाही. निसर्गाच्या विरोधात जाऊन नाही, तर निसर्गाशी मैत्नी करून, समुद्र, जमीन, आणि हवामान यांच्या गुंतागुंतीच्या नात्याचा अभ्यास करून आपले ध्येय साध्य करणारे डच आज जगातील अनेक शहरांना आपले हे ज्ञान, कला, कौशल्य, अनुभव आणि तंत्नज्ञान पुरवीत आहेत. ‘निसर्गाशी मैत्नी’ ह्या त्यांच्या बांधकाम मंत्नाचा जागर ते जगभर करीत आहेत. 
सिंगापूर हे 700 चौ.कि.मी. क्षेत्नफळ असलेल्या एका लहान बेटावर वसलेले महानगर. ब्रिटिशांनी वसाहत स्थापून भरभराटीला आणल्यापासून सिंगापूर गोड्या पाण्यासाठी मलेशियावर अवलंबून होते. परंतु आज तेथील 16-17 नद्यांच्या मुखावर बंधारे बांधून एकीकडे त्याने गोड्या पाण्याचे साठे निर्माण केले आहेत, तर तेच बंधारे समुद्राचे खारे पाणी अडवून भरतीच्या लाटा आणि नद्या-खाडीमध्ये येणार्‍या पुरापासून महानगराचे संरक्षण करीत आहे. व्हिएतनाममधील हो ची मिन्ह शहरातही एक लहान बेट खाडीमध्ये वसलेले आहे. त्या बेटाचे संरक्षण करणारे बंधारे बांधताना डच लोकांनी मोठे तांत्रिक बळ त्या शहराला पुरवून सुरक्षित केले आहे. 
थेम्स नदीवर वसलेले लंडन समुद्रकिनार्‍यापासून बरेच आत असले तरी तेथेही वादळ-वार्‍याच्या काळात समुद्राच्या उंच उसळणार्‍या लाटा आणि उधाण यापासून महानगराचे संरक्षण करण्यासाठी खास धातूंच्या मोठय़ा, सरकत्या झडपा नदीच्या पाण्यात खांबांवर बसविल्या आहेत. तेथे बाजूच्या जमिनीवर उद्याने करून लोकांना हे सर्व बघण्याची सोयही केली आहे. 
हे सर्व जुगाड 1982सालापासून कार्यरत ठेवलेले आहे. रात्नीच्या वेळेला दिव्यांची रोषणाई करून ते आकर्षक केले आहे. पुरापासून संरक्षण करतानाही पर्यावरण, उपयुक्तता तसेच सौंदर्यपूर्ण आकार यांचा विचार त्यामागे आहे. मानवी प्रज्ञा, कला, तंत्नज्ञान, विज्ञान आणि निसर्ग यांचा सुंदर संगमच तेथे बघायला मिळतो.
काही आठवड्यापूर्वी इटलीचे व्हेनिस शहर असेच महापुराच्या संकटात सापडले होते. तेथील सुप्रसिद्ध सेंट मार्क चर्च असलेल्या विस्तीर्ण सार्वजनिक चौकामध्ये पाच फूट पाणी चढले. दुकाने पाण्यात गेली. अतिशय नुकसान झाले. त्या अगोदरही अनेकदा हा अनुभव आला आहे. दीड हजार वर्षांपासून व्यापारामुळे भरभराटीला आलेल्या ह्या शहरातील वास्तुवैभव बघायला, प्रशस्त चौकाचा अनोखा अनुभव घ्यायला, तेथील कालव्यांमधील गन्डोलामधून सैर करायला आणि अनोख्या संस्कृतीचा अनुभव घ्यायला दररोज लाखभर पर्यटक जगभरातून तेथे येत असतात. त्या शहराची अर्थव्यवस्था आणि तेथील लोकांचे संपूर्ण जीवन त्यावर अवलंबून आहे. ऐतिहासिक वास्तू ठेवा आणि संपत्ती जतन करणे हे व्हेनिससाठी अतिशय महत्त्वाचे आहे. पुरापासून संरक्षण करण्यासाठी तेथे मोठे नावीन्यपूर्ण उपाय करण्याचे नियोजन करून काम सुरूही झाले; परंतु ते भ्रष्टाचाराच्या भोवर्‍यात आणि राजकारणात अडकले. महापौर तुरुंगात गेले, आरोपातून सुटले; परंतु प्रकल्प मात्न रखडला. शहर संकटात सापडत राहिले, लोकांचे नुकसान होत राहिले ते वेगळेच. हा अभिनव प्रकल्प अजूनही पूर्ण झाला नाही. पण आता प्रलयाच्या धास्तीने तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. ह्या प्रकल्पाचे नाव आहे मोस. (मोस : इलेक्ट्रोमेकॅनिकल मोड्यूल). मोठय़ा बंधार्‍याऐवजी पूरपरिस्थितीमध्ये असंख्य लहान मोड्यूल्स समुद्राच्या पाण्यात उभे करून लाटा थोपविणे अशी त्यामागची संकल्पना आहे. सुमारे दोन किलोमीटर लांबीमध्ये अशा शेकडो मोड्यूल्सची मालिका असणार आहे. 
वसाहतवादाच्या काळामध्ये संपूर्ण जगात समुद्रकिनार्‍यावर असंख्य बंदरे आणि त्यांच्या साथीने शहरे उभी राहिली. त्यामध्ये प्रचंड मानवी र्शम, संपत्ती आणि बुद्धिसार्मथ्य खर्ची पडले आहे. आज कोट्यवधी माणसे त्या शहरांच्या आधारे जगत आहेत आणि शहरांनाही जगवत आहेत. आधुनिक मानवी संस्कृती ह्या शहरांनी घडवली आहे. ज्ञान-विज्ञान-तंत्नज्ञान निर्माणाची तसेच व्यापाराची, उद्योगांची आणि अर्थव्यवहारांची, भाषा, कला आणि संस्कृतीची देवाणघेवाण आणि वृद्धीही करण्याचे काम त्यांनी गेली अनेक शतके केले आहे. मानवी स्वातंत्र्याची, समतेची, लोकशाहीची मूल्ये तेथेच घडली आहेत. 
अशा ह्या मानवी संपत्तीवर आणि संस्कृतीवर निसर्गातील बदलांचे संकट घोंगावत आहे. एका प्रकारे मानवानेच आपल्या बेबंद आणि अल्पकालीन फायद्याच्या कृतीमधून हे संकट स्वत:वर ओढवून घेतले आहे. हे संकट जागतिक आहे, मानवी आहे तसेच नैसर्गिक आहे. त्यावरचे उपाय अशाच प्रगत शहरांना शोधावे लागणार आहेत. तेथे मानवी कौशल्य, बुद्धी आणि साधनांचा कस तर लागणारच आहे; परंतु तेथे मानवी बेबंद उपभोगाला, ऊर्जा वापराला आणि कार्बन वायूनिर्मितीला र्मयादा घालाव्या लागणार आहेत. आधुनिक शहरांनी निर्माण केलेले हे पर्यावरण आणि हवामान बदलाचे संकट मानवी प्र™ोच्या मदतीनेच दूर करता येईल. रॉटरडॅम, लंडन, सिंगापूर, व्हेनिस अशासारखी भविष्यवेधी शहरे आणि तेथील प्रयोगशील तंत्नज्ञ मानवी समाजात सकारात्मक मानसिक ऊर्जाही निर्माण करीत आहेत.
(लेखिका प्रख्यात नगर नियोजनतज्ज्ञ आहेत.)

sulakshana.mahajan@gmail.com

Web Title: The dangers of the deluge and the human endeavor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.