ZP Election Results 2021: काँग्रेस-शिवसेना उमेदवाराला समान मतं; मग ४ वर्षांच्या मुलीनं ठरवला विजयी उमेदवार! नेमकं काय घडलं, वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 12:17 PM2021-10-06T12:17:18+5:302021-10-06T12:19:06+5:30

ZP Election Results 2021: अकोट तालुक्यातील अकोलखेड पंचायत समितीच्या निकाल आज राज्यातील निवडणूक निकालांमध्ये लक्षवेधी ठरला आहे.

ZP Election Results 2021 Congress Shiv Sena candidate gets equal votes 4 year old girl decided the winning candidate | ZP Election Results 2021: काँग्रेस-शिवसेना उमेदवाराला समान मतं; मग ४ वर्षांच्या मुलीनं ठरवला विजयी उमेदवार! नेमकं काय घडलं, वाचा...

ZP Election Results 2021: काँग्रेस-शिवसेना उमेदवाराला समान मतं; मग ४ वर्षांच्या मुलीनं ठरवला विजयी उमेदवार! नेमकं काय घडलं, वाचा...

Next

अकोला:

अकोट तालुक्यातील अकोलखेड पंचायत समितीच्या निकाल आज राज्यातील निवडणूक निकालांमध्ये लक्षवेधी ठरला आहे. अकोलखेड पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांना समसमान मतं पडल्याची माहिती समोर आली आहे. पंयाचत समितीत शिवसेनेचे उमेदवार सूरज गणभोज आणि काँग्रेसचे दिनकर पिपराके यांच्यात 'काटें की टक्कर' पाहायला मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे मतांचं विभाजन झालं. शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांना समसमान मतं पडली.

विजयी उमेदवार ठरवण्यासाठी यावेळी चार वर्षांच्या मुलीच्या हातून ईश्वरचिठ्ठी उडवण्यात आली. या चिठ्ठीत शिवसेनेचे सूरज गणभोज यांना नशिबानं साथ दिली आहे. ईश्वरचिठ्ठीच्या माध्यमातून सूरज गणभोज यांना विजयी उमेदवार म्हणून घोषीत करण्यात आलं आहे. अकोलखेड जिल्हा परिषदेतही शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. शिवसेनेचे जगन निचळ यांनी बाजी मारली आहे.  

Read in English

Web Title: ZP Election Results 2021 Congress Shiv Sena candidate gets equal votes 4 year old girl decided the winning candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.