'तुम्ही एकदम करेक्ट कार्यक्रम केलात...', जयंत पाटलांच्या हॉकी टीमला आगळ्यावेगळ्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 12:56 PM2021-08-05T12:56:06+5:302021-08-05T12:57:53+5:30

Jayant Patil congratulates hockey team : जर्मनीला नमवून 41 वर्षांनंतर भारतानं हॉकीमध्ये पजक जिंकलं आहे.

'You did a very accurate program', Jayant Patil's wishes to hockey team for winning bronze in Olympic | 'तुम्ही एकदम करेक्ट कार्यक्रम केलात...', जयंत पाटलांच्या हॉकी टीमला आगळ्यावेगळ्या शुभेच्छा

'तुम्ही एकदम करेक्ट कार्यक्रम केलात...', जयंत पाटलांच्या हॉकी टीमला आगळ्यावेगळ्या शुभेच्छा

Next
ठळक मुद्देया ऐतिहासिक विजयानंतर देशभरातून हॉकी संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मुंबई: यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं जबरदस्त कामगिरी करत 41 वर्षानंतर कास्य पदकारवर आपलं नाव कोरलं. जर्मनीविरोधात झालेल्या सामन्यात भारतानं 5-4 ने विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयानंतर हॉकी संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही हॉकी संघाला एकदम हटके शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत.


तब्बल 41 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारतीय हॉकी संघाने कास्य पदकावर भारताचं नाव कोरलं. देशभरातून हॉकी संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यातच जयंत पाटलांनी दिलेल्या हटके शुभेच्छांची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. 'आज 41 वर्षांनी हॉकी संघाला कांस्यपदक मिळवता आलं. हॉकी संघानं मिळवलेलं यश भारतीयांचा उर भरुन आणणारं आहे. तुम्ही एकदम करेक्ट कार्यक्रम केलात… अभिनंदन टीम इंडिया', असं ट्विट जयंत पाटलांनी केलं.

जर्मनीला नमवून 41 वर्षांनंतर भारतानं हॉकीमध्ये जिंकलं पदक
यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त खेळ करणाऱ्या भारतीय हॉकी संघाने आज ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आज जर्मनीविरुद्ध झालेल्या कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत भारताने 5-4 असा विजय मिळवत कांस्यपदकावर कब्जा केला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत भारतीय संघ एकवेळ 1-3 असा पिछाडीवर पडला होता. मात्र, या पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारत भारताने आघाडी घेतली आणि अखेरीस विजय मिळवला. भारतीय हॉकी संघाने तब्बल 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलं आहे. 

Read in English

Web Title: 'You did a very accurate program', Jayant Patil's wishes to hockey team for winning bronze in Olympic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.