मराठवाड्यातील जलयुक्त योजनेमधील २,४१६ कोटींची कामे संशयाच्या भोवऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 03:39 AM2020-10-16T03:39:27+5:302020-10-16T03:39:40+5:30

६ हजार २० गावांमध्ये केलेली कामे : १ लाख ७४ हजार १६१ कामांचा दावा

Works worth Rs 2,416 crore under water scheme in Marathwada are in doubt | मराठवाड्यातील जलयुक्त योजनेमधील २,४१६ कोटींची कामे संशयाच्या भोवऱ्यात

मराठवाड्यातील जलयुक्त योजनेमधील २,४१६ कोटींची कामे संशयाच्या भोवऱ्यात

googlenewsNext

औरंगाबाद : जलयुक्त शिवार योजनेतील कामांची चौकशी करण्याचे राज्य सरकारने ठरविल्याने आता या योजनेंतर्गत मराठवाड्यात करण्यात आलेली सुमारे २ हजार ४१६ कोटी रुपयांच्या कामांचीही चौकशी होण्याची शक्यता असल्याने ही कामे केलेल्या कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहे.

२०१५ ते २०१९ पर्यंत मराठवाडा विभागात केलेल्या ६ हजार २० गावांतील १ लाख ७४ हजार १६१ कामे संशयाच्या भोवºयात आली आहेत. मराठवाड्यातील अनेक कामांमध्ये गुत्तेदारांची मर्जी राखली गेल्याचे २०१७ मध्ये समोर आले होते. यामध्ये अनेक गुत्तेदार हे तत्कालीन सरकारच्या मजीतील होते, असे आरोप तत्कालीन विरोधी पक्षाने केले होते. ३१ मार्च २०२० पर्यंत औरंगाबाद जलसंधारण विभाग, विभागीय आयुक्तालयांतर्गत असलेल्या रेकॉर्डनुसार विभागात या योजनेतील कामांवर ९२.२३ टक्के खर्च करण्यात आला आहे. ९४.१८ टक्के कामे झाली आहेत.

योजनेतून किती पाणी साचले ?
चार वर्षांत ११.१४ टीसीएम पाणीसाठी साचल्याचा दावा रेकॉर्डनुसार दिसतो आहे. २२.२८ लक्ष हेक्टर सिंचन यातून झाल्याचाही दावा करण्यात आला आहे. २०१५ ते २०१९ पर्यंत दरवर्षी ३.३० ते १.५८ टक्क्यांदरम्यान टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला.


वर्ष गावांंची संख्या झालेला खर्च
२०१५-१६ १,६८५ ९६३ कोटी
२०१६-१७ १,५१८ ७९० कोटी
२०१७-१८ १,२४८ ३५२ कोटी
२०१८-१९ १,५६९ ३११ कोटी
एकूण ६,०२० २,४१६ कोटी

Web Title: Works worth Rs 2,416 crore under water scheme in Marathwada are in doubt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.