महिला दक्षता समित्यांचे कामकाज प्रभावीपणे व्हावे, नीलम गोऱ्हेंच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 09:19 AM2021-06-19T09:19:20+5:302021-06-19T09:20:22+5:30

Neelam Gorhe : मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांचा तत्काळ तपास होणे गरजेचे आहे. जात पंचायतींकडून होणा-या काही घटनांमध्ये तक्रारी येत आहेत. या सर्व बाबतीत महिलांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेण्याच्या सूचना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केल्या.

Women's vigilance committees should function effectively, suggests Neelam Gorhe | महिला दक्षता समित्यांचे कामकाज प्रभावीपणे व्हावे, नीलम गोऱ्हेंच्या सूचना

महिला दक्षता समित्यांचे कामकाज प्रभावीपणे व्हावे, नीलम गोऱ्हेंच्या सूचना

Next

मुंबई : राज्यातील पोलीस प्रशासनाने महिला दक्षता समित्यांचे कामकाज प्रभावीपणे होण्यासाठी लक्ष द्यावे असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. विधानभवनात महिलांविषयक विविध प्रश्नांवर दूरदृश्यप्रणालीद्वारे शुक्रवारी बैठक पार पडली. यावेळी गृह(ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, पोलीस महासंचालक (महिला विरोधी अत्याचार प्रतिबंधक) राजवर्धन सिन्हा, अकोला, बीड, नगर, सोलापुर, रायगड, अमरावती , चंद्रपुर व संबधित जिल्हयांचे पोलीस अधिक्षक दूरदृश्यप्रणालीद्वारे या बैठकीला उपस्थित होते.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, महिला दक्षता समित्यांनी प्रभावीपणे कामकाज करावे याकरिता त्यांना योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे, कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवस न झालेल्या बैठका ऑनलाईन स्वरूपात घ्यावात. महिला दक्षता समित्यांसाठी कार्यपद्धती निश्चित करावी व मार्गदर्शक पुस्तिका तयार करावी. 

बालविवाह, पोटगी, सोशल मीडियामधून वेबसाईटवरून होणारी महिलांची फसवणूक, ऊसतोड कामगार जेव्हा कामाकरिता स्थलांतरित होतात तेव्हा त्यांच्या अल्पवयीन मुलींकरिता आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा व सामाजिक संघटनांच्या सहकार्यातून विशेष बाब म्हणून लक्ष द्यावे, त्यांच्या काही तक्रारी आल्यास त्याचे तात्काळ निराकरण करावे. मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांचा तत्काळ तपास होणे गरजेचे आहे. जात पंचायतींकडून होणा-या काही घटनांमध्ये तक्रारी येत आहेत वरील सर्व बाबतीत महिलांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेण्याच्या सूचना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केल्या.

याचबरोबर, कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत विशाखा मार्गदर्शक तत्वे अस्तित्वात आहेत. त्याप्रमाणे विशाखा समित्या स्थापन करून तक्रारींचा आढावा घ्यावा. कोरोनाच्या काळात दाखल झालेल्या एफआयआर तपासात अडथळे किंवा तो तपास पूर्ण न झालेल्या 'बी समरी' रिपोर्ट झालेल्या केसेसच पुनरावलोकन करून सदरील केसेसचा आढावा घ्यावा व आवश्यकता असल्यास त्यात पुन्हा तपास करावी अशी सूचना डॉ. नीलम  गोऱ्हे यांनी यावेळी केली. 

महिलांविषयक तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करावी  - शंभूराज देसाई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंधाचे निकष पाळून महिला दक्षता समित्यांच्या बैठका सर्व जिल्हयात आयोजित कराव्यात. उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी दिलेल्या सूचनांसाठी जिथे गृह विभागातील सुधारणांची आवश्यकता आहे तिथे  शासनाच्या नियंमानुसार योग्य ती कार्यवाही गृह विभागाने करावी, तसेच सातारा जिल्हयात फक्त पत्राद्वारे आलेल्या तक्रारींवरही पोलिसांनी कार्यवाही केली आहे हा उपक्रम स्तुत्य  आहे. महिलांविषयक आलेल्या तक्रारींवर कुठल्याही प्रकारची दिरंगाई न होता  तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी दिले.

Web Title: Women's vigilance committees should function effectively, suggests Neelam Gorhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.